सुंदरतेसाठी महिलेकडून 8 कोटी खर्च
जगातील सर्वात सुंदर असल्याचा दावा
जानेआना प्राजेरेस एक असे नाव आहे जिने स्वत:चे सौंदर्य आणि आत्मविश्वासाला नवी उंची मिळवून देण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत. 35 वर्षीय ही महिला स्वत:ला जगातील सर्वात सुंदर महिला ठरविते आणि स्वत:च्या सौंदर्यावर गर्व करते. ब्राझीलच्या साओ पावलो येथे राहणारी जानेआना प्राजेरेसचे इन्स्टाग्रामवर 7.12 लाख फॉलोअर्स आहेत. माझे हे सौंदर्य नैसर्गिक नसून तर एक प्रकारे खरेदी करण्यात आलेले आहे असे ती सांगते.
आतापर्यंत 13 शस्त्रक्रिया
जानेआनाने आतापर्यंत 8 कोटी रुपये खर्च करत अनेक सर्जिकल आणि नॉन-सर्जिल प्रोसिजर करविल्या आहेत, ज्यात नाकाच्या तीन शस्त्रक्रिया, चार लिपोसक्शन, बट फीलर्स, तीन ब्रेस्ट सर्जरी, फेसलिफ्ट आणि रिब हटविणे देखील सामील आहे. सौंदर्य केवळ जेनेटिक्सचा खेळ नाही, हे समर्पण आणि स्वत:वर गुंतवणूक करण्याचा परिणाम आहे. मी स्वत:च्या सौंदर्याबद्दल गर्व करते आणि हीच मला शक्ती मिळवून देते असे तिचे सांगो आहे.
सौंदर्याची आहे किंमत
दर तीन महिन्यात बोटॉक्स आणि लिप फिलर्स करवावे लागते. याचबरोबर एंटी-एजिंग ड्रिप आणि स्कीन ट्रीटमेंटवर देखील गुंतवणूक करते. लोक माझ्यावर टीका करतात, परंतु सर्वात सुंदर महिला म्हणवून घेण्याची एक किंमत असते आणि ती मी फेडली आहे असे जानेआनाचे सांगणे आहे.
सौंदर्यामुळे मैत्री, कारकीर्दीवर प्रभाव
स्वत:च्या सौंदर्यावरून जानेआनाने अनेक भावनात्मक पैलूंवर विचार व्यक्त केले. अनेकदा माझ्या सौंदर्यामुळे लोक मला केवळ एक वस्तू किंवा ट्रॉफीप्रमाणे पाहतात, हे माझ्यासाठी खरे आणि सत्यतेचे नाते तयार करणे अवघड करते. खासकरून महिलांदरम्यान मी अनेकदा प्रतिस्पर्धा आणि ईर्ष्येचा अनुभव घेते. माझे सौंदर्य माझ्या अन्य कौशल्य आणि प्रतिभांना झाकोळते, काही कामाच्या संधीही गमवाव्या लागल्या आहेत, कारण लोक मला केवळ माझ्या शारीरिक सौंदर्याच्या दृष्टीकोनातून पाहतात असे तिने म्हटले आहे.
शस्त्रक्रियेवर मांडली भूमिका
जानेआनाने अलिकडच बट रिकंस्ट्रक्शन सर्जरीसाठी 1 लाख डॉलर्स खर्च केले आहेत. मी स्वत:चा लुक सावरण्यासाठी जे काही केले, त्याबद्दल मला पश्चाताप नाही. मी हे स्वत:चा आत्मविश्वास आणि आनंदासाठी केले आहे. महिलांना त्यांच्या सौंदर्यासोबत त्यांच्या प्रतिभा आणि क्षमतांसाठी देखील ओळखले जावे. भविष्यात समाजत महिलांचे अन्य गुण आणि योग्यतेलाही मान्यता देईल अशी अपेक्षा करत असल्याचे जानेआनाने सांगितले आहे.