Solapur News : सोलापुरात महिला रुग्णाशी गैरवर्तन प्रकरण : क्ष-किरण तंत्रज्ञ इनामदार निलंबित
आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी काढले कारवाईचे आदेश
सोलापूर : आरोग्य महापालिका विभागातील क्ष-किरण तंत्रज्ञ (एक्स-रे टेक्निशियन) गुरुप्रसाद इनामदार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी कारवाईचे आदेश काढले आहेत.
महापालिकेच्या रामबाडी यु.पी. एस.सी. केंद्रामध्ये उपचारासाठी येण्प्रया रुग्णांचे क्ष-किरणयंत्राद्वारे तपासणी करुन त्याचा अहवाल देण्याच्या काम काजाची जबाबदारी गुरुप्रसाद इनामदार यांच्यावर सोपविण्यात आली होती. दि.२६ नोव्हेंबर २०२५ रोजी रामबाडी यु. पी. एस.सी. केंद्राकडे एक महिला रुग्ण क्ष-किरण तपासणीसाठी आली असता, क्ष-किरण तंत्रज्ञ गुरुप्रसाद इनामदार यांनी गैरवर्तन केले. तशीलेखी तक्रार केलेली असून, आरोग्य अधिकारी यांनी तक्रारीच्या अनुषंगाने नियंत्रण अधिकारी यांच्या निर्देशनास आणले आहे.
ही बाब गंभीर स्वरुपाची व कार्यालयोन शिस्तीस बाधा पोहोचविणारी असून यामुळे जनमाणसांत मनपाची प्रतिमा मलिन झालेली आहे. गैरवर्तना मुळे कार्यालयीन शिस्तीचा तसेच महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक तरतुदीचा भंग झालेला आहे. त्यास सर्वस्वी गुरुप्रसाद इनामदार हेच जबाबदार आहे. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे प्रस्तावित असून, शिस्तभंगाची कारवाईस बाधा येऊ नये म्हणून, त्यांना निलंबनाधिन ठेवणे आवश्यक असल्याचे आदेशात म्हटले आहे.