भूमिगत बंकरमध्ये राहते महिला
दर महिन्याला 1 लाख रुपयांची बचत
सद्यकाळात भाडेतत्वावरील चांगले घर शोधणे अत्यंत अवघड ठरले आहे. लोकांना चांगले घर मिळाले तर भाडे अधिक असते. तर भाडे आणि घर चांगले असेल तर मालकाशी पटत नाही. यामुळे लोक घरासंबंधी तडजोड करतात. अशाच विचार एका अमेरिकन महिलेचाही होता, यामुळे ती बंकरमध्ये राहू लागली. आता पैशांची बचत करत असून घरमालकीण तिची मैत्रीण आहे.
कॅलिफोर्नियाची 44 वर्षीय महिला केटलीन जॉन्सनने एक अनोखा निर्णय घेतला आहे. ती आता एका भूमिगत बंकरमध्ये राहते, यामुळे दर महिन्याला तिची जवळपास 1.25 लाख रुपयांची बचत होत आहे. कॅलिफोर्नियात एक बेडरुम असलेल्या घराचे सरासरी भाडे 1500 ते 2000 डॉलर्सदरम्यान असते, तर केटलीनला हा बंकर केवळ 500 डॉलर्स दर महिना दरात मिळाला आहे. केटलीन आता बेकर्सफील्ड येथे स्वत:च्या एका मित्राच्या यार्डमध्ये निर्मित बंकरमध्ये राहत आहे. हा बंकर पूर्वीच्या घरमालकाकडून निर्माण करण्यात आला होता आणि दीर्घकाळापासून रिकामी होता. बंकरमध्ये एक मास्टर बेडरुम (अटॅच बाथरुमसह), फुल किचन, लिव्हिंग रुम, 18 बंक बेड, आणखी एक बाथरुम आणि दोन अतिरिक्त टॉयलेट तसेच आणखी एक शॉवर आहेस.
केवळ 500 डॉलर्स भाडे
हा बंकर एकूण 1200 चौरस फूटांमध्ये फैलावलेला असून कुठल्याही सामान्य अपार्टमेंटसारखा वाटतो. यात मोबाइल नेटवर्क आणि इंटरनेटची सुविधा देखील आहे. यामुळे केटलीनला कुठल्याही प्रकारची असुविधा होत नाही. केटलीनने स्वत:च्या मित्राकडून हा बंकर आणि यार्डचा एक हिस्सा केवळ 500 डॉलर्स प्रति महिना या भाडेदराने मिळविला आहे. याच्या बदल्यात ती बंकर आणि यार्डची देखभाल करते, यामुळे तिच्या मित्राला याची चिंता करावी लागत नाही. मी सहजपणे कुठलीही मालमत्ता खरेदी करू शकते, परंतु माझे काम सातत्याने बदलत राहते. मी कितीकाळ एकाचठिकाणी राहू शकेन, हे ठाऊक नसल्याचे केटलीनने सांगितले आहे.
2024 पासून बंकरमध्ये वास्तव्य
बंकरमध्ये प्रवेशासाठी एक हायड्रॉलिक दरवाजा असून तो उघडल्यावर 15 पायऱ्या उतरून जावे लागते आणि मग एक ब्लास्ट-प्रूफ दरवाजातून जावे लागते. बंकर अत्यंत शांत असल्याचे ती सांगते. केटलीन एप्रिल 2024 मध्ये न्यूयॉर्क येथून पॅलिफोर्नियात परतल्यावर तिने स्वत:च्या मित्राला या बंकरमध्ये राहू देण्याची विनंती केली. तिच्या मित्राने सहमती दिली आणि तेव्हापासून ती या बंकरमध्ये राहतेय. बंकरमध्ये नैसर्गिक प्रकाशाची कमतरता आहे, परंतु यामुळे केटलीनला कुठलाही त्रास होत नाही. तिने स्वत:च्या खोलीत आर्टिफिशयल सनलाइटची व्यवस्था केली आहे. परंतु हिवाळ्यात तिला काहीशी अडचण होते, कारण बाहेरही अंधार असतो आणि बंकरमध्ये तसाही प्रकाश नसतो.
जेव्हा मी घरी असते, तेव्हा हायड्रोलिक दरवाजा उघडते, जेणेकरून काहीसा प्रकाश आत येऊ शकेल. मी दिवसभरात कामात व्यग्र असते आणि रात्री बंकरमध्ये परतले. यामुळे हा अंधार जाणवत नाही, असे ती सांगते. तर तिच्या या अनोख्या जीवनशैलीवर तिचे मित्र चकित होत नाहीत. माझ्या जीवनाचे निर्णय नेहमीच काहीसे हटके राहिले आहेत. मी मनोरंजनाच्या क्षेत्राशी संबंधित असल्याने माझ्यासाठी हे सर्व सामान्य असल्याचे केटलीनने म्हटले आहे.