श्वानांसाठी नवा टीव्ही चॅनेल
हॉटेलचा अनोखा पुढाकार
दिवाळी किंवा अन्य सणांवेळी फटाके फोडण्यात आल्यावर श्वान घाबरून जातात आणि इतरत्र लपून बसून बसतात असे तुम्ही पाहिले असेल. श्वानांना फटाक्यांचा आवाज भीतीदायक वाटत असतो. श्वानांची ही भीती पाहता लंडनच्या एका हॉटेलने अनोखा पुढाकार घेतला आहे. हॉटेलने श्वानांसाठी खास टीव्ही चॅनेल सुरू केले असून ज्यामुळे त्यांना गोंगाटातही दिलासा मिळणार आहे.
लंडनच्या एका हॉटेलने फटाके फोडण्यात येत असताना श्वानांना शांत ठेवण्यासाठी अनोखा पुढाकार घेतला आहे. वर्जिन हॉटेल्स लंडन-शोरडिचने स्वत:च्या पेट-फ्रेंडली खोल्यांसाठी एक नवा टीव्ही चॅनेल सुरू केला असून याचे नाव ‘काम फॉर कॅन्नी’ आहे, म्हणजेच श्वानांसाठी दिलासा देणारा चॅनेल. याचा उद्देश फटाक्यांच्या तीव्र आवाजाला घाबरणाऱ्या पाळीव श्वानांना आराम आणि शांततेचा अनुभव करविणे आहे. या चॅनेलवर असे व्हिडिओ दाखविले जातात, ज्यात खुले मैदान आणि समुद्र किनाऱ्यावर धावणारे आनंदी श्वान दिसून येतात. तसेच शांत समुद्र लाटा, नौका, बर्फात खेळणारे ससे आणि अक्रोड चोरणाऱ्या खारींचे दृश्यही सामील आहे. या दृश्यांसोबत मंद शास्त्राrय संगीताच्या धून वाजतात, जेणेकरून वातावरण आणखी आल्हाददायक वाटू शकेल. खास बाब म्हणजे व्हिडिओ मुख्यत्वे निळ्या, पिवळ्या आणि हिरव्या रंगांमध्ये तयार करण्यात आलेले आहेत, कारण संशोधनानुसार श्वान याच रंगांच्या दिशेने सर्वाधिक आकर्षित होत असतात.
वर्जिन रेड या समुहाचा लॉयल्टी प्रोग्राम आहे. त्याच्या एका सर्वेक्षणात 87 टक्के श्वानांचे मालक फटाके वाजविण्यात येत असल्यास स्वत:च्या पाळीव प्राण्याला शहरापासून दूर ठेवणे पसंत करत असल्याचे दिसून आले आहे. 1 हजार श्वानमालकांवर करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात दोन-तृतीयांश जणांनी ते ‘बॉनफायर नाइट’ला घाबरतात, कारण त्यादरम्यान पाळीव प्राणी अत्यंत भयभीत होत असल्याचे सांगितले आहे. बॉनफायर नाइटची रात्री आमच्या चार पायांचे मित्र आणि त्यांच्या मालकांसाठी चिंतेचे कारण ठरत असते, खासकरून लंडनसारख्या शहरांमध्ये जेथे सर्वत्र आतिषबाजी होते. याचमुळे आम्ही आमच्या अतिथी श्वानांसाठी अतिरिक्त व्यवस्था केली असून ते आमच्यासोबत एक व्हीआयपी जीवन जगू शकतात. आमचा नवा कॅनाइन कामिंग व्हिडिओ श्वानांना उत्साहित करतो आणि मग हळूहळू त्यांना आरामदायी झोपेत घेऊन जात असल्याचा दावा वर्जिन हॉटेल्सच्या एका प्रवक्त्याने केला आहे.