For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उमराणीजवळ बस-कार अपघातात महिला ठार : एक गंभीर जखमी

06:50 AM Dec 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
उमराणीजवळ बस कार अपघातात महिला ठार   एक गंभीर जखमी
Advertisement

प्रतिनिधी/ चिकोडी

Advertisement

निपाणी-मुधोळ राज्य महामार्गावर उमराणी नजीक शनिवारी दुपारी कार व बसच्या समोरासमोर झालेल्या धडकेमध्ये कारमध्ये मागे बसलेली महिला जागीच ठार झाली. तर चालक जखमी झाल्याची घटना घडली. निर्मला भरमू आवटे (वय 60, रा. यादवनगर, चिकोडी) असे मृत महिलेचे नाव आहे. तर कार चालवीत असलेले चिकोडी येथील हेस्कॉमचे साहाय्यक अभियंता नेमिनाथ भरमू आवटे (वय 43) हे गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत माहिती अशी की, नेमिनाथ मूळचे रायबाग येथील असून सध्या चिकोडी शहरातील यादव नगरात त्यांचे वास्तव्य आहे. ते आपल्या कारमधून चिकोडीहून उमराणीकडे जात असताना पंक्चर झालेल्या ट्रॉलीला ओव्हरटेक करीत सावळगीहून चिकोडीकडे येणाऱ्या बसची (क्रमांक केए 42, एफ 1364) त्यांच्या कारला धडक बसली. एअर बॅग उघडल्याने नेमिनाथ या अपघातातून बचावले. तर मागे बसलेल्या त्यांच्या आई निर्मला भरमू आवटे या मात्र जागीच ठार झाल्या. नेमिनाथ यांना चिकोडी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची घटना समजताच चिकोडीचे पोलीस उपअधीक्षक गोपाळकृष्ण गौडर, मंडल पोलीस निरीक्षक विश्वनाथ चौगुला, रहदारी पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक रुपा गुडोडगी यांनी भेट देऊन पंचनामा केला. अपघातामुळे निपाणी-मुधोळ राज्य महामार्गावर काही काळ वाहतूक खोळंबली होती. चिकोडी रहदारी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.