कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दुचाकी-कंटेनरच्या धडकेत महिला ठार

12:47 PM Jun 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दुचाकी चालक गंभीर जखमी : वाळपई-होंडा मार्गावरील रेडीघाट येथील घटना,मद्यपी कंटेनर चालकाला अटक 

Advertisement

वाळपई : वाळपई-होंडा मार्गावर रेडीघाट येथे दुचाकी-कंटेनरच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. शुक्रवार दि. 27 रोजी रात्री 9 वा.  हा भीषण अपघात घडला. वनिता मोर्लेकर उर्फ पोकळे (सांखळी) असे या महिलेचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, शुक्रवारी रात्री 9 वा. वनिता मोर्लेकर उर्फ पोकळे ही  जीए-04-जे -7926 दुचाकीवरून वाळपई येथून होंडाच्या दिशेने जात होती. रेडीघाट येथे समोरून येणाऱ्या कंटेनरने एमएच-12-ए-एक्स 2564 या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामुळे दुचाकीवर मागे बसलेली वनिता मोर्लेकर हिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे, अशी माहिती स्थानिकांनी दिली.

Advertisement

कामावरून सुटून घरी जाताना काळाचा घाला 

वनिता ही वाळपई सरकारी सामाजिक ऊग्णालयात सुरक्षारक्षक म्हणून काम करत होती. आठ वाजता तिची ड्युटी संपल्यानंतर सांखळी येथील आपल्या घरी परतत होती. यावेळी प्रवासी बसेस नसल्यामुळे तिने एका दुचाकीवरून लिफ्ट घेतली होती. दुचाकीवरून घरी जाताना रेडीघाट येथे कंटेनरची धडक बसून तिचा मृत्यू झाला. वनिता ही कोपार्डे गावची मुलगी असून सांखळी येथे तिचा विवाह झाला होता. तिच्या पश्चात पती व मुलगा असा परिवार आहे.

कंटेनरचा चालक दारूच्या नशेत 

दरम्यान, सदर अपघातातील कंटेनर चालक दारूच्या नशेत होता, अशी माहिती प्राप्त झालेली आहे. धडक दिल्यानंतर चालकाने घटनास्थळावरून पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला वाळपई येथे अडवून पकडले व वाळपई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, होंडा येथून सदर कंटेनर वाळपईच्या दिशेने येत असताना चालक दारूच्या नशेत असल्याने रस्त्यात त्याची अन्य वाहनांना धडक बसता-बसता वाचली. अखेर त्याने दुचाकीला धडक दिली त्यात सदर महिलेचा बळी गेला.

पोलिसांकडून कंटेनर जप्त 

अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कंटेनर ताब्यात घेतला व चालकावर गुन्हा नोंदवून अटक केली. दरम्यान, घटनेचा पंचनामा करून वनिता मोर्लेकर हिचा मृतदेह उत्तररीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठवेला आहे.

कंटेनर चालकावर कडक कारवाई करा!

वनिता मोर्लेकर ही कोपार्डे गावातील मुलगी असल्यामुळे याबाबतची माहिती मिळतात कोपार्डे भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात घटनास्थळी दाखल झाले. सदर अपघाताला कारणीभूत ठरलेल्या मद्यपी चालकावर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांनी यावेळी केली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article