For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कारवर झाड कोसळल्याने महिला ठार

11:02 AM Jul 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
कारवर झाड कोसळल्याने महिला ठार
Advertisement

कारवार : येथील शिवाजी सर्कलजवळच्या नमन बेकरीसमोर झाडावर चढून नारळाचे झाड तोडत असताना झाड उन्मळून पडण्याची घटना ताजी असताना रविवारी दुपारी कारवर झाड कोसळून गंभीररित्या जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना येथील डॉ. पिकळे रस्त्यावर घडली. लक्ष्मी नारायण मेमूतकर (वय 35, रा. मल्लापूर) असे मयत महिलेचे नाव आहे. या दुर्घटनेबद्दल समजलेली अधिक माहिती अशी की, लक्ष्मी मेमूतकर ही महिला आपल्या सुनेला खासगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन आली होती. यावेळी वारा आणि पावसामुळे बृहत आकाराचे झाड कारवर कोसळले. झाडाचा आकार एवढा मोठा होता की, झाडाने दवाखान्यासमोरील संपूर्ण रस्ता व्यापून गेला होता. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जेसीबी आणि अन्य यंत्र सामुग्रीच्या मदतीने कारवर कोसळलेले झाड बाजूला करण्यात आले आणि गंभीर जखमी झालेल्या महिलेला  उपचारासाठी  येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचाराचा उपयोग न होता तिचा मृत्यू झाला. रविवारी येथील आठवड्याचा बाजार होता. तथापि केवळ सुदैवाने मोठी दुर्घटना टळल्याचे सांगण्यात आले. दुर्घटनास्थळी बघ्यानी मोठी गर्दी केली होती. कारचीपण मोठी हानी झाली आहे. कारवार शहर पोलीस अधिक तपास्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.