मद्यधुंद ड्रायव्हरने चुकीचा मार्ग घेतल्याने महिलेने चालत्या रिक्षेतून उडी मारली
बेंगलुरू
बेंगलुरू मधील ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनचे अनेक व्हिडीओ सध्या इंस्टाग्रामवर ट्रेण्डींग आहेत. नववर्षाच्या आगमनासाठी सगळीकडे जल्लोषी वातावरण होत, अशातच या पार्टीवरून घरी जाताना घडलेले किस्से सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.
दरम्यान बेंगलुरू मध्ये एक घटना घडली. एका महिलेने नम्मा यात्री ॲपवरू ऑटो-रिक्षा बुक केली होती. या रिक्षेतून ही महिला होरामवू वरून थानिसांद्र येथील आपल्या घरी जात होती. अचानक तिच्या लक्षात आले की रिक्षा तिच्या घराच्या दिशेन न जाता, हेब्बाळच्या दिशेने चालत आहे. पूर्व बंगळुरूमध्ये गुरुवारी रात्री या ३० वर्षीय महिलेने चालत्या ऑटो-रिक्षातून उडी मारली. सुदैवाने या महिलेला कोणतीही शारिरीक दुखापत झालेली नाही आहे.
महिलेने दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक हा त्या महिलेने सांगितलेल्या रस्त्यावरुन न जाता दुसऱ्या रस्त्याकडे चालला होता. दरम्यान तिने अचानक उडी मारून स्वतःचा बचाव केला.
या घटनेची अधिकृत माहिती संबधित महिलेने पोलिसांना दिली नसली, तर तिचे पती अझहर खान यांनी बेंगलुरू शहर पोलिसांना टॅग करत एक्स (ट्विटर) या अॅपवरून या घटनेसंबंधी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याच्या पत्नीचा त्रासदायक अनुभव शेअर केला आहे. याप्रसंगी संबंधित रिक्षाचालक हा नशेत होता असाही दावा या पोस्टमधून करण्यात आला आहे.
पुढे खान यांनी असेही लिहीले आहे, की जर अशा मोठ्या शहरात रात्री ९ च्या दरम्यान माझ्या पत्नीसोबत असे काही घडत असेल, तर इतर महिला ज्या रात्रीचा प्रवास करतात त्यांची सुरक्षा ऐरवीवर आहे.
दरम्यान अझहर यांच्या या पोस्टची दखल घेत संबंधित नम्मा यात्री या अॅपने त्यांच्याशी संपर्क केला आहे.