महिलेला विचित्र आजार
कपडे परिधान करण्यास होतो सर्वाधिक त्रास
नवनवे कपडे खरेदी करणे लोकांना अत्यंत पसंत असते. ब्रिटनच्या एका महिलेलाही हे पसंत आहे. परंतु तिला एक असा आजार आहे, ज्यामुळे नवे कपडे खरेदी केल्यावर तिला या कपड्यांना स्वत:च्या हिशेबानुसार बदलावे लागते. एका अजब आजारामुळे हे घडत आहे. या आजारामुळे तिला या कपड्यांमध्ये बदल करावे लागतात.
मिल्टन कीन्स (ब्रिटन)ची 28 वर्षीय युवा उद्योजिका बेली स्मिथ एका दुर्लभ आनुवांशिक आजाराला तोंड देत आहे. यामुळे तिचे पचनतंत्र गंभीर स्वरुपात प्रभावित आहे. या स्थितीत तिला पुरेसे पोषण आणि हायड्रेशन मिळविण्यासाठी फीडिंग ट्यूबवर निर्भर रहावे लागते. हे एक असे उपकरण आहे, जे दिवसात जवळपास 20 तास तिच्या शरीराशी जोडलेले राहते. अलिकडेच फीडिंग ट्यूब लावल्यावर बेलीचे सर्वात मोठे आव्हान कपडे परिधान करणे ठरले. तिचा पूर्ण वॉर्डरोब जवळपास निरुपयोगी ठरला आहे. दैनंदिन वापराचे कपडे आता तिच्यासाठी तोकडे अन् अनेकदा वेदनादायी ठरतात. फीडिंग ट्यूब माझ्या कपडे परिधान करण्याच्या क्षमतेला इतके प्रभावित करेल याचा अंदाज नव्हता. जुन्या कपड्यांमध्येही फिट होणे अवघड ठरले होते. ट्राउजर, टॉप, ड्रेसेज, जंपसूट सर्वकाही आता नव्या पद्धतीने विचार कराव्या लागणाऱ्या गोष्टी ठरल्या आहेत. ट्यूब कशी बसेल, कपडे किती अंतरावर राहतील, औषध घेणे किंवा पोट रिकामी करण्यासाठी ट्यूबपर्यंत सहजपणे पोहोचता येईल की नाही याचा प्रत्येकवेळी विचार करावा लागत असल्याचे बेली सांगते.