कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भरधाव कँटरने दुचाकीला ठोकरल्याने अनगोळ येथील महिलेचा मृत्यू

12:43 PM Jul 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शाळेतून मुलींना नेताना गोवावेस सर्कलमध्ये अपघात

Advertisement

बेळगाव : भरधाव कँटरने दुचाकीला ठोकरल्याने बाबले गल्ली, अनगोळ येथील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारी गोवावेस (बसवेश्वर सर्कलजवळ) ही घटना घडली असून या अपघातातून दोन मुली सुखरूप बचावल्या आहेत. शिबा वासीम इनामदार (वय 29) असे त्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. शाळेतून 7 व 4 वर्षीय मुलींना घेऊन शिबा वीरभद्रनगरला जात होती. त्यावेळी कँटरची दुचाकीला धडक बसून या अपघातात ती गंभीर जखमी झाली. तिला सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच वाहतूक विभागाचे एसीपी जोतिबा निकम, वाहतूक दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक बसगौडा पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यासंबंधी कँटरचालक बाहुबली द्यामापूर, राहणार द्यामापूर, ता. कलघटगी, जि. धारवाड याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. वाहतूक दक्षिण विभाग पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article