भूषणगड येथे विवाहितेची छोट्या मुलीसह आत्महत्या
05:01 PM Apr 10, 2025 IST | Radhika Patil
Advertisement
औंध :
Advertisement
भूषणगड (ता. खटाव) येथील तीस वर्षीय विवाहितेने तीन वर्षांच्या मुलीसह विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली. सदर घटनेची नोंद औंध पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे.
याबाबत औंध पोलीस स्टेशनमधून मिळालेली अधिक माहिती अशी, पती पत्नीमध्ये वारंवार होत असलेल्या वादातून चिडून जाऊन बुधवारी सकाळी नऊचे सुमारास भूषणगड येथील पंतवस्ती शेतातील घराच्या मागील विहिरीत सीमा रविंद्र येवले (वय 30) यांनी आपल्या तीन वर्षांची मुलगी तन्वी रविंद्र येवले हिच्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी रविंद्र रामहरी येवले यांनी औंध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. दरम्यान आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. अधिक तपास सपोनि अविनाश मते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाघमारे अधिक तपास करीत आहेत.
Advertisement
Advertisement