महाराष्ट्र | कोकणकोल्हापूरअहमदनगरइतरमुंबई /पुणेसांगलीसातारासोलापूर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

गोकाक तालुक्यातील महिलेचा दूषित पाण्यामुळे मृत्यू

11:52 AM Jun 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आरोग्य विभागाकडून परिसराची पाहणी

Advertisement

बेळगाव : दूषित पाण्यामुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांत रोगराई सुरू झाली आहे.गोकाक तालुक्यातील कणसगेरी येथील एका महिलेचा रविवारी मृत्यू झाला असून गावातील दहा जण अत्यवस्थ झाले आहेत.या घटनेनंतर आरोग्य खात्याला खडबडून जाग आली आहे.जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी महेश कोनी यांनी कणसगेरीला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली आहे. एका विहिरीचे पाणी पिऊन ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.होळेव्वा बाळप्पा दनदवर (वय 38) असे दूषित पाण्याचा बळी ठरलेल्या महिलेचे नाव आहे. उलटी-जुलाबाने ती अत्यवस्थ झाली होती. तिला इस्पितळाला हलविताना रविवारी सायंकाळी वाटेतच तिचा मृत्यू झाला आहे.आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी अत्यवस्थ नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याकडूनही माहिती घेतली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article