Kolhapur News : कोल्हापुरात प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू; नवजात बालिका आईविना झाली पोरकी
कोल्हापूरात प्रसूतीनंतर दुर्दैवी मृत्यूची घटना
कोल्हापूर : प्रसुतीनंतर शरीरातील रक्तदाब आणि नवजातऑक्सिजन पुरवठा कमी झाल्याने महिलेचा सोमवारी (८ डिसेंबर) पहाटे मृत्यू झाला. अंतिमा आनंदा गुप्ता (वय ३४, सध्या रा. राजारामपुरी पाचवी गल्ली, मूळ रा. उत्तरप्रदेश) असे मृत महिलेचे दोन तासांतच नवजात बालिका आईच्या मायेला पोरका झाली. अंतिमा गुप्ता यांना रविवारी रात्री प्रसवकळा सुरू झाल्या.
त्यानंतर नातेवाईकांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मध्यरात्री दीडच्या सुमारास नैसर्गिक प्रसूती होऊन त्यांनी मुलीस जन्म दिला. त्यानंतर काही वेळातच रक्तदाब आणि शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन त्या बेशुद्ध पडल्या.
त्यांना तातडीने सीपीआरमध्ये दाखल करण्याचा सल्ला खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला. त्यानुसार नातेवाईकांनी पहाटे चारच्या सुमारास अंतिमा यांना सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली.
१५ दिवसातील दुसरी घटना
पंधरा दिवसांपूर्वी पंचगंगा हॉस्पिटलमध्ये प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू झाला होता. प्रसुतीनंतर चार दिवसांनी महिलेचा मृत्यू झाला होता. तर सोमवारी पहाटे प्रसुतीनंतर अवघ्या काही तासांमध्येच अंतिमा गुप्ता यांचा मृत्यू झाला.