Solapur : सोलापुरात बल्करची दुचाकीला मागून धडक, महिला मृत्यूमुखी
पतीसोबत दुचाकीवरून जात असताना ट्रकची धडक
सोलापूर : दुचाकीवर मागे बसून जात असताना मागून बल्कर ट्रकने दिलेल्या धडकेत महिला मृत्यूमुखी पडल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील शांती चौक येथे घडली. जयश्री अरुण जाधव (वय-४०, रा. तेलगांव ता. दक्षिण सोलापूर) असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे.
ही महिला गुरुवारी सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास आपल्या पतीसोबत दुचाकीवरुन मागे बसून बोरामणीहून तेलगावकडे जात होत्या. त्यांची दुचाकी ही शांती चौक (पाणी टाकी) येथे आली असता बल्कर टॅकरने मोटारसायकलला मागून जोराची धडक दिली.
या धडकेत जयश्री या खाली पडून गंभीर जखमी झाल्या. त्यांना जखमी अवस्थेत तातडीने सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.