राजारामपूरीत महिलेची आत्महत्या
कोल्हापूर :
राजारामपूरी येथील जागृतीनगर हौसिंग सोसायटीमधील एका गरोदर विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केली. तिच्या गळ्याभोवतीचा फास सोडवून सासरच्या मंडळीनी तिला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यु झाला. याची माहिती समजताच संबंधीत विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी सीपीआरमध्ये धाव घेवून, सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप केल्यामुळे सीपीआरच्या अपघात विभागासमोरच वादाला तोंड फुटल्याने, दोन गटात हाणामारी झाली. यामुळे सीपीआरच्या आवारात काही काळ तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती.
पोलिसांच्याकडून समजलेली माहिती अशी, राजारामपूरीतील जागृतीनगर हौसिंग सोसायटीमधील प्रमोद वडर या तऊणाचा सांगवडेवाडी (ता. करवीर) येथील चंद्रकांत वडर यांची मुलगी नेत्राबरोबर सन 2022 साली विवाह झाला होता. या दाम्पत्याला पहिला मुलगा असून, नेत्रा सध्या ती गर्भवती आहे. अशातच तिने शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. तिच्या गळ्याभोवतीचा फास सोडवून, तिच्या पत्नी, सासू-सासऱ्याने तिला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. पण तिचा उपचारापूर्वीच मृत्यु झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगतिले. तिच्या मृत्यु माहिती सांगवडेवाडी या माहेरच्या लोकांना समजताच त्यांनी सीपीआरमध्ये धाव घेतली. त्यांनी मुलीचा मृतदेह पाहताच संतप्त होवून, सासरच्या मंडळींना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यातूनच वाद वाढत गेला आणि दोन गटात अपघात विभागासमोर मारामारी झाली. यामुळे सीपीआरमध्ये काही तणावपूर्ण शांतता निमॉण झाली होती. पोलिसांनी व सीपीआरच्या सुरक्षा रक्षकांनी यामध्ये हस्तक्षेप करीत तणाव निवळला. या घटनेची माहिती समजताच राजारामपूरी पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी व पोलिसांनी सीपीआरमध्ये धाव घेतली. यावेळी त्यांच्या समोर मृत नेत्रा हिच्या माहेरच्या लोकांनी तिचा पती, सासू-सासरा, नंणद यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार केली. पण याबाबत रात्री उशिरापर्यंत राजारामपूरी पोलिसात गुन्हा नोंद झाला नव्हता.