Miraj Crime : मिरजेत महिलेला मारहाण करुन दागिने हिसकावले
मजूरीच्या पैशासाठी गेलेल्या महिलेवर मारहाण
मिरज : कृष्णाघाट रस्त्यावर मजूरीचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण करुन तिच्या गळ्यातील दीड तोळेचे गंठण हिसकावून घेण्यात आले. तशी तक्रार वैशाली सुनिल कांबळे (रा. बानलेसवाडी, रेणूका मंदिराजवळ, यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात तक्रार दिली त्यानुसार संशयीत महेश माळी, सुगिता माळी, सानिया शरिकमसलत आणि मुमताज शरिकमसलत (सर्व रा. कृष्णाघाट रोड) अशा चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
वैशाली कांबळे यांच्या काका किरण पवार यांचे मजूरीचे पैसे संशयीत महेश माळी हा देणार होते. पैसे आणण्यासाठी वैशाली कांबळे, त्यांचे पती व काका असे तिघे संशयीत महेश माळी याच्या घरी गेले होते. पैसे न देता संशयीत माळीने भांडण काढले. यावेळी वैशाली कांबळे यांना चौघांनी मारहाण केली. यावेळी मारहाणीत गळ्यातील दीड तोळेचे सोन्याचे गंठणही हिसकावून घेतले असल्याची तक्रार वैशाली कांबळे यांनी गांधी चौकी पोलिसात दिली आहे. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.