Miraj News : आटपाडी करगणीमध्ये लांडग्यांचा हल्ला; 16 मेंढ्या ठार
03:20 PM Dec 09, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement
करगणी येथील नागमळीमध्ये मेंढ्यांवर प्राणीहल्ला
Advertisement
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील करगणी येथे आनंदा सरक यांच्या मालकीच्या मेंढ्यांच्या कळपावर लांडग्याने हल्ला केल्याची घटना घडली. लांडग्याच्या हल्ल्यात १६ मेंढ्या ठार झाल्या असून या घटनेने सरक कुटुंबावर मोठे संकट कोसळले.
करगणी येथील नागमळी येथे वास्तव्यास असलेल्या आनंद सरक या शेतकऱ्यांचा मेंढ्याचा कळप आहे. या कळपावर शनिवारी मध्यरात्री चार ते पाच लांडग्याच्या कळपाने हल्ला केला. लांडग्याच्या हल्ल्याची चाहूल लागल्यानंतर लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनास्थळी तीन मोठ्या मेंढ्या, पाच लहान कोकरांचे मृत शरीर आढळून आले. तर अन्य मेंढ्या व कोकरे गायब होती.
Advertisement
Advertisement