Sanagli News | घाटनांद्रेत लांडग्याचा हल्ला; चार शेळ्यांचा बळी
छगन पवार यांच्या चार शेळ्यांचा लांडग्याच्या हल्ल्यात मृत्यू
कवठेमहांकाळ : घाटनांद्रे (ता. कवठेमहांकाळ) येथील पशुपालक शेतकरी छगन बापूसो पवार यांच्या चार शेळ्या लांडग्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडल्या असून, ही घटना सोमवारी रात्री एक ते दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की घाटनांद्रे येथील मुख्य चौकातील गंगलमहाल मंदिरासमोर असलेल्या छगन पवार घराजवळ सदर शेळ्या बांधलेल्या होत्या. त्यातील चार शेळ्यावर मध्यरात्री लांडग्याने हल्ला केल्याने त्या मृत्यूमुखी पडल्या असून, यात या पशुपालक शेतकऱ्यांचे मोठे आि थक नुकसान झाले आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच कवठेमहंकाळ वनविभागाचे वनपाल अजित सूर्यवंशी व तिसंगीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. फोपसे, सरपंच अमर शिंदे यांनी भेट देऊन पंचनामा केला. या शेतकऱ्यांची परिस्थीतीही अगदी बेताची असून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.