महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शिवभक्तांवरील गुन्हे सरकारने मागे घ्यावेत; खासदार महाडिक यांची गृहमंत्र्यांकडे मागणी

04:48 PM Jul 19, 2024 IST | Abhijeet Khandekar
MP Mahadik demand Home Minister Fadanvis
Advertisement

विशाळगडावरील झालेल्या हिंसाचारामध्ये शिवभक्तांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्यांच्या भविष्याचा विचार करून मागे घेण्याची विनंती राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Advertisement

आपल्या निवेदनामध्ये खासदार महाडिक यांनी म्हटले आहे कि, १४ जुलै रोजी विशाळगडावरील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेसाठी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्याबद्दल आता दावे- प्रतिदावे होत आहेत. मात्र आंदोलनात सहभागी असलेल्या काही तरुण शिवभक्तांवर आता पोलिस यंत्रणेने गुन्हे दाखल केले आहेत. सामाजिक शांतता राखण्यासाठी आणि त्या तरुणांचे भवितव्य लक्षात घेऊन, राज्य शासनाने संबंधित शिवभक्त तरुणांवरील गुन्हे तातडीने मागे घ्यावेत." असे म्हटले आहे. या मागणीला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देताना संपूर्ण घटनेची पूर्ण माहिती घेऊन, कोणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचं आश्वासन त्यांनी दिले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
Home Minister FadanvisMP MahadikShiv devoteeswithdraw crimes
Next Article