For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अवैधपणे गावठी पिस्तुल स्वत: जवळ ठेवल्याप्रकरणी चौघे अटकेत; कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाकेची कामगिरी

03:17 PM Jul 19, 2024 IST | Abhijeet Khandekar
अवैधपणे गावठी पिस्तुल स्वत  जवळ ठेवल्याप्रकरणी चौघे अटकेत  कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाकेची कामगिरी
Advertisement

एक गावठी बनावटीचे पिस्तुल, एक जीवंत काडतुस, एक मोपेड असा 1 लाख 5 हजार 200 ऊपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर प्रतिनिधी

कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अवैधपणे पिस्तुलची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघा तऊणांना रंगेहाथ पकडले. अक्षय सचिन सुतार (वय 20, रा. जोतीबा मंदिराजवळ, आपटेनगर, कोल्हापूर), अजिक्य अनिल सुतार (वय 22, रा. जोतीबा मंदिराशेजारी म्हसवे, ता. भुदरगड) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक मोपेड आणि गावठी बनावटीची एक पिस्तुल, एक जीवंत काडसुस असा 1 लाख 5 हजार 200 ऊपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई कोल्हापूर-इस्पुर्ली रस्त्यावरील जैताळ गावच्या हद्दीतील हॉटेल सासुरवाडी समोर करण्यात आली. तसेच या दोघा संशयीत तऊणांनी ज्याच्याकडून गावठी पिस्तुल विक्रीसाठी आणले होते. त्या दोघांना ही पोलिसांनी अटक केली. पवन धोंडीराम कांबळे (वय 27, रा. जोतीबा मंदिराजवळ, आपटेनगर, कोल्हापूर), अमोल सुरेंद्र खंदारे (वय 28, रा. सुर्वेनगर, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत. त्यामुळे विनापरवाना, बेकायदेशिर गावठी बनावटीच्या पिस्तुल विक्री प्रकरणी अटक केलेल्या संशयीतांची संख्या चार झाली आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी दिली.

Advertisement

पोलीस निरीक्षक कळमकर म्हणाले, बेकायदेशिर अग्निशस्त्र (पिस्तुल) आणि दाऊगोळा (काडतुसे) बाळगणाऱ्या व्यक्तीचा शोध घेवून, त्यांच्याकडील अग्निशस्त्र व दाऊगोळा जप्त करीत, त्यांच्याविरोधी कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना आदेश दिला होता. त्यावऊन अशा व्यक्तीचा शोध सुऊ केला होता. याचदरम्यान कोल्हापूर-इस्पुर्ली रस्त्यावरील जैताळ गावच्या हद्दीतील हॉटेल सासुरवाडी समोर दोन तऊण पिस्तुल विक्रीसाठी येणार आहे, अशी माहिती बातमीदारांकडून समजली. त्यावऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ, शाहुपूरी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार संदिप जाधव, पोलीस अमंलदार विनोद चौगुले, संजय पडवळ, यशवंत कुंभार, विनोद कांबळे, रोहीत मर्दाने आदींच्या पथकाने या ठिकाणी सापळा लावला. यावेळी एका मोपेडवऊन दोन तऊण येत असल्याचे पथकातील पोलिसांना दिसून आले. त्यांनी त्यांना अडवून त्यांची अंगझडती घेतली. त्यावेळी त्यांच्याजवळ एक गावठी बनावटीचे एक पिस्तुल आणि एक जीवंत काडतुस मिळून आले. ते जप्त करीत या दोघा अटक केली. त्यांच्याकडे हे पिस्तुल जीवंत काडतुस कोठून आणि कोणाकडून आणले. याविषयी चौकशी सुऊ केली.

चौकशीदरम्यान या दोघांनी हे गावठी पिस्तुल आणि काडतुस पवन धोंडीराम कांबळे (वय 27, रा. जोतीबा मंदीरजवळ, आपटेनगर, कोल्हापूर) याने विक्री करण्यासाठी दिल्याचे सांगितले. त्यावऊन त्यांचा शोध घेवून, त्याला पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याने हे पिस्तुल व काडतुस ऋतुराज इंगळे (रा. आपटेनगर, कोल्हापूर) याचेकडून त्यांने अमोल सुरेंद्र खंदारे (वय 28, रा. सुर्वेनगर, कोल्हापूर) यांच्याकडून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यावऊन त्यांचा ही शोध घेवून त्याला पकडून अटक केली. याबाबत इस्पुर्ली पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.