For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पशुपती पारस ‘रालोआ’सोबतच!

06:04 AM Mar 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
पशुपती पारस ‘रालोआ’सोबतच
Advertisement

लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत : काका-पुतण्यामध्ये समेट

Advertisement

वृत्तसंस्था/ पाटणा

बिहारमधील बडे नेते पशुपती कुमार पारस यांनी आपल्या भूमिकेत मवाळपणा घेत लोकसभा निवडणूक न लढवण्याचा ‘इरादा पक्का’ केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते हाजीपूरमधून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू होती. तसेच त्यांचे पुतणे चिराग पासवान यांनीही याच जागेवरून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. अशा स्थितीत काका-पुतण्यामध्ये संघर्षाचे वातावरण पाहायला मिळत होते. मात्र आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पशुपती पारस निवडणूक लढवणार नसून ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबतच (रालोआ) राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advertisement

रालोआतील ज्येष्ठ नेते आणि कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर पशुपती पारस यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली. त्यांचा पक्ष आरएलजेपी एनडीएमध्येच राहणार आहे. म्हणजेच आता काका पशुपती कुमार पारस आणि पुतणे चिराग पासवान यांच्यात समेट झाल्याचे मानले जात आहे. पशुपती पारस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट शेअर करून लोकसभा निवडणुकीत एनडीएला पाठिंबा देण्याची माहिती दिली आहे. त्याचवेळी पशुपती कुमार पारस यांनी पुन्हा एकदा आपल्या ‘एक्स’ खात्यावर मोदींच्या नेतृत्त्वाखालील एनडीएचाही उल्लेख केला आहे.

पशुपती पारस यांनी अलिकडेच केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिल्यानंतर एनडीएचा उल्लेख आपल्या ‘एक्स’ खात्यातून काढून टाकला होता. आता मात्र त्यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर करत ‘आमचा पक्ष आरएलजेपी एनडीएचा अविभाज्य भाग आहे! माननीय पंतप्रधान देखील आमचे नेते आहेत. त्यांचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली रालोआ संपूर्ण देशात विक्रमी बहुमताने 400 हून जागा जिंकून तिसऱ्यांदा सरकार स्थापन करेल’, असा आशावाद व्यक्त केला आहे. जागावाटपात पशुपती कुमार पारस यांच्या ‘आरएलजेपी’ला लोकसभेत एकही जागा मिळालेली नाही. एनडीएच्या जागावाटपात अन्याय झाल्याने त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. पण, आता पशुपती पारस यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून एनडीएमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :

.