For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लवलिनाच्या पराभवासह बॉक्सिंगमधील आव्हानही संपुष्टात

06:37 AM Aug 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
लवलिनाच्या पराभवासह  बॉक्सिंगमधील आव्हानही संपुष्टात
China's Li Qian hits India's Lovlina Borgohain in their women's 75 kg quarterfinal boxing match at the 2024 Summer Olympics, Sunday, Aug. 4, 2024, in Paris, France. (AP/PTI)(AP08_04_2024_000179B)
Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

Advertisement

भारताची स्टार बॉक्सर लवलिना बोर्गोहेनचा पॅरिस ऑलिम्पिकमधील प्रवास संपला आहे. महिलांच्या 75 किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या ली कियानने लवलिनाचा 4-1 असा पराभव केला. या सामन्यात भारतीय बॉक्सरने चांगली कामगिरी केली, मात्र चीनच्या बॉक्सरचे आव्हान तिला महागात पडले, यामुळे सलग दुसरे ऑलिम्पिक पदक जिंकण्यापासून लवलिना चुकली. याशिवाय, पुरुष बॉक्सिंगच्या 71 किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय बॉक्सर निशांत देवला मेक्सिकोच्या मार्को वर्देकडून पराभव पत्करावा लागला.

महिलांच्या 75 किलो गटात चीनच्या कियानने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. कियानच्या आक्रमकतेसमोर लवलिनाचा टिकाव लागला नाही. तिच्याकडून अनेक चुका झाल्या, याचा तिला फटका बसला. विशेष म्हणजे, मेरी कोम आणि विजेंदर सिंग यांच्यानंतर टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी लवलिना तिसरी भारतीय बॉक्सर ठरली होती. आता, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याची तिला नामी संधी होती पण उपांत्यपूर्व फेरीतील पराभवामुळे तिच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.

Advertisement

लांब उडीत निराशा, जेसविन ऑल्ड्रिन पात्रता फेरीतच बाहेर

भारताचा लांब उडीपटू जेसविन ऑल्ड्रिनला पुरुषांच्या लांब उडी स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही. तो एकूण 26 व्या स्थानावर राहिला. 22 वर्षीय लाँग जम्परने पात्रता गट ब मध्ये 7.61 मीटर उडी मारली, ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. ऑल्ड्रिनने त्याच्या गटातील 16 खेळाडूंपैकी 13 वे स्थान पटकावले. तो पात्रता मानक (8.15 मी) ओलांडण्यात अयशस्वी ठरला.

पारुल चौधरी आठव्या स्थानी

भारताची पारुल चौधरी महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेस पात्रता स्पर्धेत आठव्या स्थानावर राहिली आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकली नाही. पारुलने या काळात हंगामातील सर्वोत्तम कामगिरी केली. शर्यत पूर्ण करण्यासाठी तिने 9 मिनिटे 23 सेकंद घेतले. या प्रकारात तीन हीटमध्ये प्रत्येकी पाच स्पर्धक अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात.

Advertisement
Tags :

.