इच्छा पूर्ण करणारे पात्र
जर तुम्हाला काही मिळवायचे असेल तर त्यासाठी मेहनत करावी लागते. माणूस स्वत:च्या इच्छापूर्तीसाठी भरपूर मेहनत करतो. दिवसरात्र झटल्यावर लोक स्वत:ची इच्छा पूर्ण करू शकतात. परंतु या इच्छा लिहून एका पात्रात टाकल्यावर पूर्ण होतील का? चीनमध्ये असाच एक विश बाऊल आहे. लोक या पात्रात स्वत:च्या इच्छा लिहून टाकतात. यानंतर त्यांच्या या इच्छा पूर्ण होत असल्याचे बोलले जाते.
चीनमध्ये खासकरून नववर्षादरम्यान लोक स्वत:च्या इच्छा कागदावर लिहून एका पात्रात तो टाकतात. स्वत:च्या इच्छा लिहून लाल रंगाच्या कपड्यात त्या गुंडाळल्या जातात, यानंतर तो कागद या पात्रात टाकला जातो. हे पात्र अत्यंत उंचीवर आहे. अशास्थितीत याच्या आत स्वत:ची इच्छा लिहून टाकणे एक आव्हान आहे. अनेकदा लाल कपड्यात गुंडाळलेली इच्छा विश बाऊलपर्यंत पोहोचत नाही, ज्याची इच्छा पोहोचते, त्याची इच्छा पूर्ण होते असे मानले जाते.
विश बाउल ही संकल्पना चीनमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. खासकरून नववर्षाच्या जल्लोषादरम्यान हा प्रकार मोठ्या प्रमाणात दिसून येतो. लोक लाल कागदावर स्वत:च्या इच्छा लिहून तो लाल बॉलमध्ये गुंडाळून बाउलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात. विश बाउलमध्ये पोहोचली तर ती लवकर पूर्ण होईल, अशी आशा त्यांना असते. या इच्छा बहुतांशकरून यश आणि प्रगतीशी निगडित असतात. इच्छांच्या पात्रालाही चांगल्याप्रकारे सजविले जात असते.
फेंग शुईशी आहे संबंध
विश बाउलचा संबंध फेंगशुईशी आहे. अशास्थितीत लोक स्वत:च्या इच्छा लिहून पात्रात टाकतात. यानंतर इच्छा पूर्ण होईल अशी अपेक्षा वाढते, अशाप्रकारचा विचार केल्यानेच लोकांच्या इच्छा अनेकदा पूर्ण होत असतात.