For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात

11:33 AM Oct 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात
Advertisement

बेंगळूर : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात बेळगावमधील सुवर्णसौध येथे होणार आहे. बेंगळूरमध्ये सोमवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात बेळगावमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. अधिवेशनाची तारीख आणि किती दिवस अधिवेशन भरवावे, हे ठरविण्याचे अधिकार मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती कायदा व संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील यांनी दिली.

Advertisement

Advertisement
Tags :

.