For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची विजयी सलामी

06:36 AM Jun 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची विजयी सलामी
Advertisement

18 वर्षाखालील मुले व मुलींची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा, हरिद्वार -2025.

Advertisement

वृत्तसंस्था/    डेहराडून

महाराष्ट्राच्या दोन्ही संघानी पहिल्या 18 वर्षाखालील मुले व मुलींच्या राष्ट्रीय कब•ाr स्पर्धेत विजयी सलामी दिली. हरिद्वार, उत्तर प्रदेश येथे सुरु असलेल्या मुलींच्या इ गटात महाराष्ट्राने झारखंडवर 50-16 अशी सहज मात करीत साखळीत पहिल्या विजयाची नोंद केली.

Advertisement

आक्रमक सुरुवात करीत महाराष्ट्राने पूर्वार्धात 35-10 अशी भक्कम आघाडी घेत आपला विजय निश्चित केला. उत्तरार्धात त्याच जोशात खेळ करीत गुणांचे अर्धशतक गाठले. बिदिशा सोनार, सेरेना म्हसकर यांचा चढायांचा झंझावात थोपविणे झारखंडला जमले नाही. प्रतीक्षा गुरव हिचा बचाव उत्कृष्ट होता. यांच्या खेळामुळे महाराष्ट्राला हा विजय सोपा गेला. या इ गटात महाराष्ट्रसह झारखंड व छत्तीसगड हे संघ आहेत. या गटात जेतेपद मिळवायचे असेल तर महाराष्ट्राला छत्तीसगडला पराभूत करावे लागेल.

मुलांच्या गटातही धमाकेदार विजय

मुलांच्या सामन्यात महाराष्ट्राने इ गटात केरळचा 54-24 असा दारुण पराभव केला. बचाव व आक्रमणावर समांतर भर देत मुलांनी विश्रांतीलाच 21-08 अशी आघाडी घेतली होती. नंतर देखील आपला खेळात सातत्य राखत गुणांचे अर्धशतक पार करीत सामना एकतर्फी केला. स्वराज मुळे, अथर्व सोनवणे यांच्या तुफानी चढाया त्यांना जीवन जाधव, प्रसाद दिघोळे यांची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे हा विजय सहज शक्य झाला. केरळ संघाला उत्तरार्धात थोडा फार सूर सापडला पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. या गटात महाराष्ट्रासह दिल्ली व केरळ हे अन्य संघ आहेत. या गटाचे जेतेपद मिळविण्याकरिता महाराष्ट्राला दिल्लीचे आव्हान पेलावे लागेल.

Advertisement
Tags :

.