For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओव्हल द हंड्रेड स्पर्धेत विजेता

06:44 AM Aug 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
ओव्हल द हंड्रेड स्पर्धेत विजेता
Advertisement

वृत्तसंस्था/लंडन

Advertisement

वेगवान गोलंदाज शकीब मेहम्मुद तसेच जॅक्स आणि कॉक्स यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर येथील लॉडस् मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात ओव्हल संघाने सदर्न ब्रेव्हचा 17 धावांनी पराभव करत सलग दुसऱ्यांदा द हंड्रेड क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले.

ओव्हल संघातील शकीब मेहम्मुदला सामनावीराचा पुरस्कार तर सॅम करनला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. सॅम करनने या स्पर्धेत फलंदाजीत 6 डावांत 2 अर्धशतकांसह 201 धावा तर गोलंदाजीत 17 गडी बाद केले. या अंतिम सामन्यात सदर्न ब्रेव्हने नाणेफेक जिंकून ओव्हलला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. ओव्हल संघातील जॅक्सने 22 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 37 धावा जमविल्या. डेव्हीड मलानने 7 धावा जमविल्या. कॉक्स आणि सॅम करन यांनी 46 धावांची भागिदारी केली. कॉक्सने 17 चेंडूत 3 चौकारांसह 25 तर करनने 20 चेंडूत 3 चौकारांसह 25 धावा जमविल्या. 72 चेंडूत ओव्हल संघाचे शतक पूर्ण झाले. टॉम करनने 11 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 24 तर लेमोनबायने 9 चेंडूत 2 चौकारांसह 16 धावा केल्या. 100 चेंडूत ओव्हलने 9 बाद 147 धावा जमविल्या. सदर्न ब्रेव्हतर्फे अकिल हुसेनने 34 वाधांत 3 तर आर्चरने 36 धावांत 2 गडी बाद केले.

Advertisement

प्रत्युत्तरादाखल खेळताना सदर्न ब्रेव्हच्या डावाला दमदार सुरूवात झाली. सलामीच्या अॅलेक्स डेव्हीसने 23 चेंडूत 6 चौकारांसह 35, व्हिन्सेने 22 चेंडूत 3 चौकारांसह 24 धावा जमविताना सलामीच्या गड्यासाठी 58 धावांची भागिदारी केली. लॉरेन इव्हॉन्सने 16 तर ओव्हरटनने 11 चेंडूत नाबाद 22 धावा जमविल्या. सदर्न ब्रेव्हने 100 चेंडूत 7 बाद 130 धावा जमविल्याने त्यानां उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

संक्षिप्त धावफलक: ओव्हल 100 चेंडूत 9 बाद 147 : सदर्न ब्रेव्ह 100 चेंडूत 7 बाद 130

सिनेर-टिफोई अंतिम लढत

Advertisement
Tags :

.