कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कडोली ग्रामपंचायत क्षेत्रात वाईन शॉपला परवानगी देऊ नये

10:27 AM May 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जाफरवाडी ग्रामस्थांतर्फे कडोली ग्राम पंचायतीला निवेदन 

Advertisement

वार्ताहर/कडोली

Advertisement

कडोली ग्राम पंचायत क्षेत्रात वाईन शॉप (दारुचे दुकान) उघडण्याचा घाट घातला जात असून, या वाईन शॉपला परवानगी देऊ नये, अशी मागणी करणारे निवेदन जाफरवाडी ग्रामस्थांच्यावतीने कडोली ग्राम पंचायतीला देण्यात आले.कडोली ग्राम पंचायत क्षेत्र हे सर्वोदयी विचार सरणीचे क्षेत्र म्हणून परिचित आहे. या ठिकाणी पूर्वीपासून सर्वोदयी कार्यकर्ते कै. सदाशिवराव भोसले आणि सहकाऱ्यांना दारुचे दुकान होऊ नये, यासाठी नेहमीच पुढाकार घेतला होता आणि दारुचे दुकान होऊ दिले नाही. दुकानाला परवानगी दिल्यास उपोषणाला बसण्याची तयारी दाखविली होती. त्यामुळे कडोली ग्राम पंचायत क्षेत्रात दारुचे दुकान थाटण्यात आले नव्हते. पण आता पुन्हा एकदा कडोली ग्रामपंचायत क्षेत्रात दारुचे दुकान थाटण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. या दुकानाला परवानगी देवू नये, अशा मागणी करणारे निवदेन जाफरवाडी ग्रामस्थांच्यावतीने ग्रामपंचायतीच्या पीडीओ कृष्णाबाई भंडारी यांच्याकडे देण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article