For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विंडीज महिला संघाची विजयी सलामी

01:45 AM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
विंडीज महिला संघाची विजयी सलामी
Advertisement

शतकवीर हेली मॅथ्यूज सामनावीर, पाकचा 113 धावांनी पराभव

Advertisement

वृत्तसंस्था/ कराची

यजमान पाक आणि विंडीज महिला क्रिकेट संघातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत कर्णधार हेली मॅथ्यूजच्या शानदार नाबाद शतकाच्या जोरावर विंडीज महिला संघाने पाकवर 113 धावांनी दणदणीत विजय मिळवत विजयी सलामी दिली.

Advertisement

या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. विंडीजने 50 षटकात 8 बाद 269 धावा जमवल्या. त्यानंतर पाकचा डाव 35.5 षटकात 156 धावात आटोपला.

विंडीजच्या संघामध्ये सलामीच्या कर्णधार मॅथ्यूजने 150 चेंडूत 1 षटकार आणि 15 चौकारांसह नाबाद 140 धावा झळकवल्या. कॅम्पबेलने 71 चेंडूत 4 चौकारांसह 45, नेशनने 14 चेंडूत 3 चौकारांसह 17, हेन्रीने 23 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 23, अॅलेनीने 2 चौकारांसह 17 धावा जमवल्या. विंडीजच्या डावात 2 षटकार आणि 29 चौकार नोंदवले गेले. पाकतर्फे सादिया इक्बाल आणि तुबा हसन यांनी प्रत्येकी दोन तर निदा दार आणि संधू यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजच्या अचूक गोलंदाजीसमोर पाकचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. त्यांच्या एकाही फलंदाजाला 30 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. तुबा हसनने 2 चौकारांसह 25, अल्वीने 1 चौकारांसह 20, मुनिबा अलीने 1 चौकारांसह 22, कर्णधार निदा दारने 3 चौकारांसह 19, अलिया रियाजने 16, डायना बेगने 1 चौकारांसह 10 धावा जमवल्या. पाकच्या डावामध्ये 10 चौकार नोंदवले गेले. विंडीजतर्फे हेली मॅथ्यूजने 17 धावात 3, फ्लेचर आणि जेम्स यांनी प्रत्येकी दोन, तर कॉनेल व हेन्री यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : विंडीज 50 षटकात 8 बाद 269 ( हेली मॅथ्यूज नाबाद 140, कॅम्पबेल 45, हेन्री 23, अॅलेनी 17, नेशन 17, अवांतर 7, सादिया इक्बाल, तुबा हसन प्रत्येकी दोन बळी, निदा दार, संधू प्रत्येकी एक बळी), पाक 35.5 षटकात सर्वबाद 156 (मुनिबा अली 22, निदा दार 19, अलिया रियाज 16, फातिमा सना 10, अल्वी 20, तुबा हसन 25, बेग 10, अवांतर 22, मॅथ्यूज 3-17, फ्लेचर 2-19, जेम्स 2-14, कॉनेल 1-19, हेन्री 1-30).

Advertisement
Tags :

.