महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

विंडीज महिला संघाचा सलग दुसरा विजय

06:15 AM Apr 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ कराची

Advertisement

तीन सामन्यांच्या वनडे क्रिकेट मालिकेत विंडीजच्या महिला क्रिकेट संघाने पाकवर 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली आहे. या मालिकेतील खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात विंडीजने पाक महिला क्रिकेट संघाचा दोन गड्यांनी पराभव केला. या सामन्यात विंडीजच्या स्टिफेनी टेलरला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.

Advertisement

या सामन्यामध्ये पाक महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पाकचा डाव 48.5 षटकात 223 धावात आटोपला. त्यानंतर विंडीजने शेवटच्या चेंडूवर पाकचा पराभव केला. विंडीजने 50 षटकात 8 बाद 225 धावा जमवित हा सामना 2 गड्यांनी जिंकला.

पाकच्या डावामध्ये सिद्रा अमिन तसेच बिस्मा महारुफ यांनी शानदार अर्धशतके झळकवली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 80 धावांची भागिदारी केली. अमिनने 70 चेंडूत 4 चौकारांसह 50 तर मारुफने 105 चेंडूत 3 चौकारांसह 65 धावा जमविल्या. कर्णधार निदा दारने 2 चौकारांसह 15, फातिमा सनाने 2 चौकारांसह 11 अल्वीने 1 चौकारासह 25 धावा जमविल्या. विंडीजतर्फे हेन्री आणि करिश्मा रामरेक यांनी प्रत्येकी 3 गडी तर फ्लेचरने 2 गडी व मॅथ्यूजने 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजच्या डावात सलामीच्या हिली मॅथ्यूजने 63 चेंडूत 3 चौकारांसह 44, विल्यम्सने 7 धावा केल्या. कॅम्पबेलने 73 चेंडूत 4 चौकारांसह 52 तसेच सामनावीर स्टिफेनी टेलरने 90 चेंडूत 9 चौकारांसह 73 धावा झळकवल्या. हेन्रीने 20 चेंडूत 1 षटकार, 2 चौकारांसह 23 धावा जमविल्या. विंडीजला विजयासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत झगडावे लागले. कॅम्पबेन आणि टेलर यांनी तिसऱ्या गड्यासाठी 88 धावांची भागिदारी केली. पाकतर्फे निदा दारने 52 धावांत 4 तर युमी हनीने 38 धावांत 2 तसेच फातिमा सना व सादिया इक्बाल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : पाक 48.5 षटकात सर्व बाद 223 (सिद्रा अमिन 50, मारुफ 65, निदा दार 15, सना 11, अल्वी 25, अवांतर 30, हेन्री, करिश्मा रामरेक प्रत्येकी 3 बळी, फ्लेचर 2-46, मॅथ्यूज 1-41), विंडीज 50 षटकात 8 बाद 225 (मॅथ्यूज 44, कॅम्पबेल 52, स्टिफेनी टेलर 73, हेन्री 23, अवांतर 11, निदा दार 4-52, हनी 2-38, सना आणि सादिया इक्बाल प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article