For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विंडीज महिलांची स्कॉटलंडवर 6 गड्यांनी मात

06:42 AM Oct 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
विंडीज महिलांची स्कॉटलंडवर 6 गड्यांनी मात
Advertisement

चिनेली हेन्री सामनावीर, विंडीजचा स्पर्धेतील पहिला विजय 

Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

2024 च्या आयसीसी महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात विंडीजने स्कॉटलंडचा 50 चेंडू बाकी ठेऊन 6 गड्यांनी दणदणीत पराभव केला. या स्पर्धेत विंडीजला पहिल्या सामन्यात हार पत्करावी लागली होती. तर स्कॉटलंडचा हा सलग दुसरा पराभव आहे.

Advertisement

या सामन्यात स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 99 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजने 11.4 षटकात 4 बाद 101 धावा जमवित स्पर्धेत आपले विजयाचे खाते उघडले.

स्कॉटलंडच्या डावात कर्णधार कॅथरीन ब्राईसने 31 चेंडूत 1 चौकारासह 25, अॅलिसा लिस्टरने 33 चेंडूत 1 चौकारासह 26, हॉर्लेने 9 चेंडूत 2 चौकारांसह 11, जॅक ब्राऊनने 11 चेंडूत 1 चौकारासह 11, कार्टरने 15 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 14 धावा जमविल्या. स्कॉटलंडच्या डावात 6 चौकार नोंदविले गेले. स्कॉटलंडचे अर्धशतक 10.4 षटकात (64 चेंडूत) फलकावर लागले. पॉवरप्लेच्या 6 षटकात त्यांनी 25 धावा जमविताना 2 गडी गमविले. 10 षटकाअखेर स्कॉटलंडने 2 बाद 45 धावा जमविल्या होत्या. विंडीजतर्फे फ्लेचरने 22 धावात 3, तर हेन्री, मॅथ्युज, करिश्मा रामहरक यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजच्या डावात जोसेफने 18 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 31, डॉटीनने 15 चेंडूत 2 षटकार 2 चौकारांसह नाबाद 28, चिनेली हेन्रीने 10 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह नाबाद 18, कर्णधार मॅथ्युजने 8, टेलरने 4 तर कॅम्पबेलने 2 धावा जमविल्या. विंडीजला 10 अवांतर धावा मिळाल्या. विंडीजच्या डावात 4 षटकार आणि 8 चौकार नोंदविले गेले. स्कॉटलंडतर्फे बेलने 18 धावात 2, तर स्लेटर आणि प्रियानाझ चटर्जी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. विंडीजने पॉवरप्लेच्या 6 षटकात 46 धावा जमविताना 2 गडी गमविले. विंडीजचे अर्धशतक 41 चेंडूत तर शतक 70 चेंडूत फलकावर लागले. 10 षटकाअखेर विंडीजने 4 बाद 73 धावा जमविल्या होत्या.

संक्षिप्त धावफलक : स्कॉटलंड 20 षटकात 8 बाद 99 (लिस्टर 26, ब्राईस 25, कार्टर नाबाद 14, हॉर्ले 11, अवांतर 4, फ्लेचर 3-22, हेन्री, मॅथ्युज, रामहरक प्रत्येकी 1 बळी), विंडीज 11.4 षटकात 4 बाद 101 (जोसेफ 31, डॉटीन नाबाद 28, हेन्री नाबाद 18, अवांतर 10, बेल 2-18, स्लेटर व चटर्जी प्रत्येकी 1

Advertisement
Tags :

.