महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विंडीजचा इंग्लंडवर पाच गड्यांनी विजय

06:31 AM Nov 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

टी-20 मालिकेत विंडीजचा हा पहिला विजय, होप सामनावीर

Advertisement

वृत्तसंस्था/ ग्रोस आयलेट

Advertisement

‘सामनावीर’ शाय होप आणि इव्हीन लेव्हिस यांच्या अर्धशतकांच्या जोरावर यजमान विंडीजने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथ्या सामन्यात इंग्लंडचा 6 चेंडू बाकी ठेऊन 5 गड्यांनी पराभव केला. या मालिकेतील विंडीजचा हा पहिला विजय असून इंग्लंडचा संघ 3-1 असा आघाडीवर आहे.

या चौथ्या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंडने 20 षटकात 5 बाद 218 धावा जमवित विंडीजला विजयासाठी 219 धावांचे आव्हान दिले. विंडीजने 19 षटकात 5 बाद 221 धावा जमवित विजय नोंदविला.

इंग्लंडच्या डावाला सॉल्ट आणि जॅक्स यांनी बऱ्यापैकी सुरुवात करुन देताना 5 षटकात 54 धावांची अर्धशतकी भागिदारी केली. जॅक्सने 12 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 25 धावा जमविल्या. जोसेफने त्याला झेलबाद केले. जॅक्स बाद झाल्यानंतर सॉल्ट आणि कर्णधार बटलर यांनी दुसऱ्या गड्यासाठी 48 धावांची भर घातली. सॉल्टने 35 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारांसह 55 धावा जमविल्या. सॉल्टचे अर्धशतक 32 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने नोंदविले. चेसने त्याला झेलबाद केले. मोतीने बटलरला चेसकरवी झेलबाद केले. त्याने 23 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 38 धावा जमविल्या. जेकॉब बेथेलने नोंदविलेल्या नाबाद अर्धशतकामुळे इंग्लंडला 218 धावांपर्यंत मजल मारता आली. बेथेलने 32 चेंडूत 5 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 62 धावा झळकाविल्या. बेथेलचे अर्धशतक 22 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने नोंदविले गेले. लिव्हिंगस्टोन केवळ 4 धावांवर तंबूत परपला बेथेल आणि सॅम करण यांनी पाचव्या गड्यासाठी अभेद्य 63 धावांची भागिदारी केली. डावातील शेवटच्या चेंडूवर सॅम करण धावचीत झाला. त्याने 13 चेंडूत 2 षटकारांसह 24 धावा जमविल्या. इंग्लंडला 10 अवांतर धावा मिळाल्या. इंग्लंडच्या डावात 16 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे मोतीने 2 तर अल्झारी जोसेफ आणि चेस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. इंग्लंडने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 63 धावा जमविताना 1 गडी गमाविला. इंग्लंडचे अर्धशतक 26 चेंडूत, शतक 54 चेंडूत, दीडशतक 88 चेंडूत, द्विशतक 110 चेंडूत नोंदविले गेले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना लेव्हिस आणि होप या सलामीच्या जोडीने 9.1 षटकात 136 धावांची भागिदारी करुन संघाच्या विजयाचा पाया रोवला. लेव्हिसने 31 चेंडूत 7 षटकार आणि 4 चौकारांसह 68 तर होपने 24 चेंडूत 3 षटकार आणि 7 चौकारांसह 54 धावा झळकाविल्या. मात्र यानंतर लेव्हिस आणि हॉप हे दहाव्या षटकातील पाठोपाठच्या 2 चेंडूवर तंबूत परतले. रेहान अहमदच्या या षटकातील तिसऱ्या चेंडूवर पूरन खाते उघडण्यापूर्वीच त्रिफळाचीत झाला. विंडीजची यावेळी स्थिती 3 बाद 136 अशी होती. कर्णधार पॉवेल आणि हेटमायर यांनी चौथ्या गड्यासाठी 36 धावांची भर घातली. रेहान अहमदने हेटमायरला 7 धावांवर झेलबाद केले. टर्नरने पॉवेलला पायचीत केले. त्याने 23 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 38 धावा जमविल्या. रुदरफोर्ड आणि चेस यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. रुदरफोर्डने 17 चेंडूत 3 षटकारांसह नाबाद 29 तर चेसने नाबाद 9 धावा जमविल्या. विंडीजला 16 अवांतर धावा मिळाल्या. इंग्लंडतर्फे रेहान अहमदने 43 धावांत 3 तर टर्नरने 42 धावांत 1 गडी बाद केले. विंडीजच्या डावात 16 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. विंडीजने पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या 6 षटकात 69 धावा जमविल्या. विंडीजने अर्धशतक 26 चेंडूत, शतक 45 चेंडूत, दीडशतक 67 चेंडूत आणि द्विशतक 105 चेंडूत फलकावर लागले. होपने 23 चेंडूत 3 षटकार आणि 7 चौकारांसह तर लेव्हिसने 26 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकारांसह अर्धशतक झळकाविले. विंडीजला शेवटच्या 3 षटकामध्ये विजयासाठी 21 धावांची गरज होती. मोसेलीच्या षटकात रुदरफोर्डने सलग षटकार ठोकून आपल्या संघाला 6 चेंडू बाकी ठेऊन विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक : इंग्लंड 20 षटकात 5 बाद 218 (सॉल्ट 55, जॅक्स 25, बटलर 39, बेथेल नाबाद 62, सॅम करण 24, अवांतर 10, मोती 2-40, चेस 1-47, अल्झारी जोसेफ 1-33), विंडीज 19 षटकात 5 बाद 221 (लेव्हिस 68, होप 54, पॉवेल 38, हेटमायर 7, रुदरफोर्ड नाबाद 29, चेस नाबाद 9, अवांतर 16, रेहान अहमद 3-43, टर्नर 1-42).

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article