For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विंडीज, दक्षिण आफ्रिका आज ‘मस्ट विन’ स्थितीत

06:29 AM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
विंडीज  दक्षिण आफ्रिका आज ‘मस्ट विन’ स्थितीत
Advertisement

वृत्तसंस्था/ नॉर्थ साउंड

Advertisement

यजमान वेस्ट इंडिजची गाठ आज येथे सोमवारी दक्षिण आफ्रिकेशी पडणार असून टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळविण्याच्या दृष्टीने सुपर एटच्या या आपल्या अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करणे त्यांच्यासाठी अत्यावश्यक बनलेले आहे. पहिल्या सुपर एट सामन्यात इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर विंडीजने अमेरिकेला नऊ गडी राखून पराभूत केले होते.

दक्षिण आफ्रिकेवरील विजयामुळे त्यांना अंतिम चारमध्ये प्रवेश मिळेल, तर पराभव पत्करावा लागल्यास त्यांची स्थिती बिकट होईल. दक्षिण आफ्रिकेने आतापर्यंत त्यांचे सर्व सहा सामने जिंकले आहेत आणि ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहेत. परंतु त्यांना देखील उपांत्य फेरीत स्थानाची अद्याप खात्री नाही आणि त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी त्यांना आज विजयाची आवश्यकता असेल.

Advertisement

वेस्ट इंडिज इंग्लंडविऊद्ध स्ट्राइक फिरविण्यात अयशस्वी ठरला होता. परंतु त्यांनी शाई होपच्या 39 चेंडूंत 82 धावांच्या खेळीच्या जोरावर अमेरिकेविरुद्ध वर्चस्व गाजविले. होपने पॉवरप्लेमध्ये आतषबाजी करणे अपेक्षित असताना विंडीजकडे निकोलस पूरन, आंद्रे रसेल यांसारखे काही मोठे पॉवर-हिटर्स देखील आहेत, जे अंतिम षटकांत जबाबदारी उचलू शकतात. शिवाय त्यांच्याकडे काइल मेयर्स देखील असून त्याला सलामीला पाठविण्याचा मोह त्यांना होतो का हे पाहावे लागेल.

दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने सर्व विजय मिळवून व विक्रम करूनही आतापर्यंत तो संघ प्रबळ दिसलेला नाही. अमेरिका आणि नेपाळसारख्या संघांविरुद्ध त्यांना संघर्ष करावा लागलेला आहे. त्यांच्यातर्फे क्विंटन डी कॉक आणि रीझा हेंड्रिक्स फलंदाजीत चमकलेले आहेत, तर एन्रिक नॉर्टजे आणि केशव महाराज हे त्यांचे उत्कृष्ट गोलंदाज आहेत.

सामन्याची वेळ : सकाळी 6 वा. (भारतीय वेळेनुसार)

Advertisement
Tags :

.