महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विंडीजचा आफ्रिकेवर दणदणीत विजय

06:50 AM Aug 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पूरनची 26 चेंडूत नाबाद 65 धावांची तुफानी खेळी

Advertisement

वृत्तसंस्था/ त्रिनिदाद अँड टोबॅगो

Advertisement

येथील ब्रायन लारा स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या पहिल्या टी 20 सामन्यात यजमान वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेवर 7 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह विंडीजने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेने 7 बाद 174 धावा केल्या, यानंतर  विंडीजने विजयासाठीचे लक्ष्य अवघ्या 17.5 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. निकोलस पूरनने 26 चेंडूत 2 चौकार व 7 षटकारासह नाबाद 65 धावांची खेळी साकारत विंडीजच्या विजयात मोलाचे योगदान दिले. उभय संघातील दुसरा सामना दि. 25 रोजी होईल.

प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. चौथ्या षटकातच दोन्ही सलामीवीरांना वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी पॅव्हेलियनमध्ये पाठवले. सातव्या षटकापर्यंत दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता, तर धावफलकावर केवळ 42 धावा होत्या. यानंतर ट्रिस्टन स्टब्स आणि पॅट्रिक क्रुगर यांनी संघाला सावरले. स्टब्सने 42 चेंडूत 76 धावा केल्या तर पॅट्रिक क्रुगरने 32 चेंडूत 44 धावांचे योगदान दिले. या दोन फलंदाजांच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 7 गडी गमावून 174 धावांची सन्मानजनक धावसंख्या उभारली आणि वेस्ट इंडिजला 175 धावांचे लक्ष्य मिळाले.

पूरनचा धमाका, होप अॅथनेजचीही दमदार खेळी

प्रत्युत्तरात, धावांचा पाठलाग करताना विंडीजने दमदार सुरुवात केली. एलिक अॅथनेज आणि शाय होप यांच्यात पहिल्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी झाली. अॅथनेजने 40 धावांचे योगदान दिले व तो डावातील आठव्या षटकात बाद झाला. यानंतर शाय होपनेही अर्धशतकी खेळी साकारताना 36 चेंडूत 51 धावा फटकावल्या. होप बाद झाल्यानंतर निकोलस पूरनने आपला फॉर्म कायम ठेवत 250 च्या स्ट्राइक रेटने 26 चेंडूत 65 धावा केल्या. आपल्या खेळीत त्याने 2 चौकार व 7 षटकार खेचले. पूरनने तुफानी खेळी साकारताना आफ्रिकन गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या जोरावर विंडीजने विजयी लक्ष्य 17.5 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात पार केले.

संक्षिप्त धावफलक : दक्षिण आफ्रिका 20 षटकांत 7 बाद 174 (मॅरक्रम 14, ट्रिस्टन स्टब्ज 76, पॅट्रिक व्रुगर 44, मॅथ्यू फोर्ड 3 तर शमार जोसेफ 2 बळी).

वेस्ट इंडिज 17.5 षटकांत 3 बाद 176 (अॅथनेज 40, शाय होप 51, पूरन नाबाद 65, पॉवेल 7, रोस्टन चेस नाबाद 4, बार्टमन 2 बळी)

पूरनचा झंझावात

पूरनने आफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्यात 26 चेंडूत 65 धावांची विस्फोटक खेळी खेळली. या खेळीत त्यानं दोन चौकार आणि तब्बल 7 षटकार मारले. या शानदार खेळीसह पूरनने आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत सूर्यकुमार यादव, ग्लेन मॅक्सवेल आणि जोस बटलरला मागे टाकले आहे. निकोलस पूरनच्या पुढे आता मार्टिन गुप्टिल (173) आणि रोहित शर्मा (205) आहेत. पूरन 139 षटकारासह तिसऱ्या स्थानी आहे.

आंतरराष्ट्रीय टी 20 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू

  1. रोहित शर्मा - 205 (159 सामने)
  2. मार्टिन गुप्टिल - 173 (122 सामने)
  3. निकोलस पूरन - 139 (96 सामने)
  4. जोस बटलर - 137 (124 सामने)
  5. सूर्यकुमार यादव - 136 (71 सामने)
  6. ग्लेन मॅक्सवेल - 134 (113 सामने).

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article