महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

विंडीज-इंग्लंड दुसरी कसोटी आजपासून

06:44 AM Jul 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

यजमानांचा अंतिम संघ जाहीर, अँडरसनच्या जागी वुडचा समावेश

Advertisement

वृत्तसंस्था/ नॉटिंगहॅम

Advertisement

गुरुवारपासून येथे सुरू होणाऱ्या विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड अंतिम संघ जाहीर केला आहे. या संघात फक्त एक बदल करण्यात आला आहे.

अंतिम अकरा खेळाडूंच्या संघात निवृत्त झालेल्या जेम्स अँडरसनच्या जागी मार्क वुडला स्थान देण्यात आले आहे. लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या कसोटीनंतर अँडरसनने निवृत्ती जाहीर केली. ही कसोटी इंग्लंडने डावाने जिंकून मालिकेत आघाडी घेतली आहे. या सामन्यात अँडरसनने दोन्ही डावांत मिळून 4 बळी टिपले. 2003 मध्ये त्याने लॉर्ड्सवरच कसोटी पदार्पण केले होते. मुरलीधरन (800) व शेन वॉर्न (708) यांच्यानंतर तो सर्वाधिक बळी (704) मिळविणारा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज बनला. पहिल्या कसोटीत इंग्लंडने युवा वेगवान गोलंदाज गस अॅटकिन्सनलाही कसोटी पदार्पणाची संधी दिली. त्याने हा विश्वास सार्थ ठरविताना 106 धावांत 12 बळी मिळविण्याचा पराक्रम केला. पदार्पणातच कसोटी इतिहासातील चौथ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी त्याने नोंदवली. पहिल्या डावात त्याने 7 बळी मिळविले होते. या मालिकेतील तिसरी कसोटी एजबॅस्टन, बर्मिंगहॅम येथे 26 जुलैपासून खेळविली जाणार आहे. या मालिकेत तीन कसोटी होत असून मालिकेतील चुरस टिकवण्यासाठी ट्रेंट ब्रिजवरील कसोटी जिंकून विंडीजला बरोबरी साधण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे.

अँडरसन गोलंदाज मेंटर म्हणून काम पाहणार

पहिल्या कसोटीनंतर निवृत्त झालेला 41 वर्षीय वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन इंग्लंड संघासोबत उर्वरित दोन कसोटीसाठी गोलंदाज मेंटर म्हणून राहणार आहे. त्यामुळे ट्रेंट ब्रिजमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या कसोटीत तो नव्या भूमिकेत दिसणार आहे. निवृत्त झाल्यानंतर अनेक आजी व माजी खेळाडूंनी त्याच्या कामगिरीचा गौरव करून मानवंदना दिली होती.

या कसोटीसाठी जाहीर करण्यात आलेला इंग्लंड संघ : झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, गस अॅटकिन्सन, मार्क वुड, शोएब बशिर.

वेस्ट इंडीज संघ : क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), मिकाईल लुईस, कर्क मॅकेन्झी, अॅलिक अॅथनेझ, केव्हम हॉज, जेसन होल्डर, जोशुआ दा सिल्वा, गुडाकेश मोती, अल्झारी जोसेफ, शमार जोसेफ, जेडेन सील्स.

सामन्याची वेळ : दुपारी 3 पासून.

Advertisement
Next Article