खजाना भविष्य
बुधवार दि. 1 जानेवारी ते मंगळवार दि. 7 जानेवारी 2025 पर्यंत
वाचकांना नव वर्षाचे गिफ्ट!!!
नवग्रह द्वादश ग्रह यंत्र
बुध यंत्र 24
9 4 11
10 8 6
5 12 7
शुक्र यंत्र 30
11 6 13
12 10 8
7 14 9
चंद्र यंत्र 18
7 2 9
8 6 4
3 10 5
गुरु यंत्र 27
10 5 12
11 9 7
6 13 8
सूर्य यंत्र 15
6 1 8
7 5 3
2 9 4
मंगळ यंत्र 21
8 3 10
9 7 5
4 11 6
केतू यंत्र 39
14 9 16
15 13 11
10 17 12
शनि यंत्र 33
12 7 14
13 11 9
8 15 10
राहू यंत्र 36
13 8 15
14 12 10
9 16 11
यम यंत्र 48
17 12 19
18 16 14
13 20 15
वरूण यंत्र 45
16 11 18
17 15 13
12 19 14
अरुण यंत्र 42
15 10 17
16 14 12
11 18 13
या कागदाच्या मागे पांढरा कागद चिकटवावा. सॉफ्ट लॅमिनेशन करून घ्यावे. प्रत्येक यंत्रावरती मधले बोट ठेवावे, डावा हात आपल्या हृदयावर ठेवून नवग्रह स्तोत्र प्रत्येक यंत्रा करताना नऊ वेळा म्हणावे. ॐ अरुणाय नम:, ॐ वरुणाय नम:, ॐ यमाय नम: मंत्राचा 108 जप शेवटच्या 3 यंत्रांकरता करावा. जवळपास असलेल्या नवग्रह मंदिरामध्ये जाऊन लॅमिनेशन केलेला हा कागद मूर्तींना लावावा, प्रार्थना करावी आणि देवघरात ठेवावा. तुम्ही नवग्रह यंत्राबद्दल ऐकले असेल. पण मुळात ज्योतिषशास्त्रात नऊ नाही तर बारा ग्रह आहेत. म्हणून प्रथमच हे द्वादश गृहयंत्र प्रसिद्ध करतो आहे. सगळ्यांचे कल्याण व्हावे, सगळे सुखी राहावे.
मेष
चिंता कमी होतील व वस्त्र-आभूषणांतून लाभ होईल. नव्या फायदेशीर योजनांची प्राप्ती. मुले सर्व प्रकारे अनुकूल राहतील व कर्जातून मुक्त होण्याचे प्रयत्न वेगवान होतील. भावांचे सहकार्य मिळेल. शुक्र व शनिवारी मात्र सतर्क राहावे लागेल. नोकरी व व्यवसायात प्रवास यशस्वी. नोकरीत कामे वाढतील. शिक्षणात वरिष्ठ व शिक्षक सहकार्य करतील व अभ्यासाकडे कल राहील.
उपाय : कुत्रे पाळा.
वृषभ
हा काळ खूप शुभ राहील. प्रियजनांची भेट होईल. मानसिक शांती मिळेल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर होतील. नकारात्मक परस्पर संबंधांमधील गैरसमज दूर करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. तुमचे महत्त्वाचे कागद जपून ठेवा. मालमत्तेशी संबंधित समस्या आणि अडथळे येऊ शकतात. तुम्ही तुमच्या मनोबलाने त्यांच्यावर मात करू शकाल.
उपाय : साखर दान करा.
मिथुन
जर तुम्ही तुमचे घर बदलण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात संबंधित निर्णय घेण्यासाठी अनुकूल वेळ आहे. सामाजिक कार्यात सहभागी होऊन तुम्हाला ओळख आणि सन्मान मिळेल. तुमची प्रतिभा आणि क्षमता लोकांसमोर येईल. कोणत्याही कामात घाई करणे टाळा. शेजाऱ्यांशी काही मुद्यावरून वाद होऊ शकतो. शांत राहा. गुंतवणुकीत तोटा सारखी परिस्थिती उद्भवू शकते.
उपाय : केळी दान द्या.
कर्क
व्यवसायात धांदल राहील. शेअर बाजारात गुंतवणूक करू नका. बेकायदेशीर कामात गुंतू नका. काही प्रकारची चौकशी होण्याची शक्मयता आहे. नोकरीत बॉस आणि अधिकाऱ्यांसोबत छोट्या-छोट्या गोष्टींवरून तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे काळजी घ्या. कोणतेही सरकारी प्रकरण प्रलंबित असल्यास, या आठवड्यात त्याचा निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो.
उपाय : पांढरे तीळ पाण्यात सोडा.
सिंह
एखाद्या वरिष्ठ व्यक्तीच्या मदतीने जुन्या समस्येवर तोडगा निघेल. तुम्हाला आराम आणि शांती मिळेल. पूर्ण आत्मविश्वासाने कामावर लक्ष केंद्रित करू शकाल. राग आणि अहंकारामुळे काम बिघडू शकते. शांततापूर्ण वृत्तीचा अवलंब केल्यास परिस्थिती लवकरच अनुकूल होईल. विद्यार्थ्यांना मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागेल. व्यवसायात तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला चांगले परिणाम मिळतील.
उपाय : लिंबे पाण्यात सोडा.
कन्या
नोकरदार लोक जास्त कामामुळे तणावात राहतील. तुम्हाला नको असलेला प्रवासही करावा लागू शकतो. तऊणांनी करिअरबाबत काळजी घ्यावी. वैयक्तिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात व्यस्तता राहील. विद्यार्थ्यांना करिअरमध्ये अडचणी येऊ शकतात, त्यामुळे मार्गदर्शनाची गरज आहे. कठोर परिश्र्रम करण्याची वेळ आली आहे, परंतु लवकरच चांगले परिणाम मिळतील.
उपाय : कुत्र्याला खाऊ घाला.
तूळ
व्यावसायिक कामात सुधारणा होईल. नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ योग्य नाही. तुमच्या कामाच्या पद्धती कोणाशीही शेअर करू नका. तुमच्या मेहनतीचा फायदा दुसरा कोणी घेऊ शकतो. सरकारी नोकरीत अधिकाऱ्यांच्या अडचणीत येऊ नका. घरात आणि बाहेर तुमचा सन्मान होईल. तुमची बुद्धिमत्ता आणि व्यावसायिक विचार यांचा तुम्हाला फायदा होईल.
उपाय : गणेश उपासना करा.
वृश्चिक
कोणत्याही कामात तुमची मेहनत वाढवून तुम्ही सकारात्मक परिणाम मिळवू शकता. सासरच्यांशी सुरू असलेले गैरसमज दूर होऊ शकतात. संबंध सुधारतील. घरामध्ये काही शुभ कार्याचे आयोजन करण्याची योजना देखील तयार केली जाईल. आनंदाचे वातावरण राहील. निरूपयोगी गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका. मेहनत केली तरच नशीब तुमच्या पाठीशी राहील.
उपाय : कुलपुरोहीताचा सन्मान करा.
धनु
मालमत्ता खरेदी-विक्रीचे काम होईल. त्यांना चांगले परिणाम देखील मिळू शकतात. मुलांच्या शिक्षणाशी संबंधित समस्या सोडवल्यास मोठा दिलासा मिळेल. मित्र किंवा नातेवाईकांशी जुने मतभेद संपतील. कोणत्याही कामावर आंधळेपणाने विश्वास ठेवणे हानिकारक ठरू शकते. स्वत:वर विश्वास ठेवणे चांगले होईल. योग्य वेळी योग्य निर्णय घेणे चांगले राहील.
उपाय : पिवळ्या वस्तू वाहत्या पाण्यात सोडा.
मकर
गैरसमजांमुळे भावंडांच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. कुटुंब तणावग्रस्त होऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल. अतिरिक्त काम करू नका, वेळोवेळी विश्र्रांती घ्या. विचार न करता बाहेरच्या किंवा अनोळखी व्यक्तींच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. तसेच कोणतेही वचन देऊ नका. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.
उपाय : गुरुवारी कांदा खाऊ नका.
कुंभ
विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. एखाद्या कामात अपेक्षित परिणाम न मिळाल्याने चिडचिड होऊ शकते. अशा वेळी रागावून नुकसान करणे टाळा. मुलांच्या समस्या ऐका आणि सोडवा. खूप कामामुळे तुम्ही घरातील कामांना वेळ देऊ शकणार नाही. सदस्य तुमच्या समस्या समजून घेतील आणि तुम्हाला पाठिंबा देतील. प्रेमसंबंधांच्या दृष्टिकोनातून काळ शुभ आहे.
उपाय : उशीखाली बडीशेप ठेवा.
मीन
जवळच्या नातेवाईक किंवा मित्राशी गैरसमज झाल्यामुळे संबंध बिघडू शकतात. युवकांनी कामात यश न मिळाल्याने तणावग्रस्त न होता प्रयत्न करा. मनोबल उंच ठेवा. वाहन काळजीपूर्वक चालवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात नवीन कामासाठी माहिती घेणे महत्त्वाचे आहे. गुंतवणुकीसाठी अनुकूल काळ आहे. तुमची योजना कोणाशीही शेअर करू नका. घाईघाईत काम बिघडू शकते.
उपाय : माशांना खाद्य घाला.