विंडीजचा लंकेवर 5 गड्यांनी विजय
टी-20 मालिका, ब्रेन्डॉन किंग ‘सामनावीर’
वृत्तसंस्था / डंबुला
यजमान लंका आणि विंडीज यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत विंडीजने विजयी सलामी दिली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात विंडीजने लंकेचा 5 चेंडू बाकी ठेवून पाच गड्यांनी पराभव केला. 33 चेंडूत 63 धावा जमविणाऱ्या विंडीजच्या ब्रेन्डॉन किंगला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून लंकेला प्रथम फलंदाजी दिली. लंकेने 20 षटकात 7 बाद 179 धावा जमवित विंडीजला 180 धावांचे आव्हान दिले. विंडीजने 19.1 षटकात 5 बाद 180 धावा जमवित आपले विजय नेंदविला. लंकेतर्फे कर्णधार असालेंका आणि कमिंदु मेंडीस यांची अर्धशतके वाया गेली तर विंडीजतर्फे किंग आणि लेव्हीस यांनी अर्धशतके झळकविली.
लंकेच्या डावामध्ये कमिंदु मेंडीसने 40 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारासह 51 तर कर्णधार असालेंकाने 35 चेंडूत 9 चौकारांसह 59 धावा जमविल्या. कुशल मेंडीसने 16 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 19 तर निशांकाने 10 चेंडूत 2 चौकारांसह 11 आणि भानुका राजपक्षेने 11 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 17 धावा केल्या. लंकेच्या डावात 4 षटकार आणि 21 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे शेफर्डने 2 तर अलझारी जोसेफ, शमार जोसेफ, मोती आणि स्प्रिंगेर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. पॉवरल्पे दरम्यानच्या 6 षटकात 54 धावा जमविताना 2 गडी गमविले. लंकेचे अर्धशतक 35 चेंडूत, शतक 69 चेंडूत तर दीड शतक 102 चेंडूत नोंदविले गेले. कमिंदु मेंडीस आणि असालेंका यांनी चौथ्या गड्यासाठी 82 धावांची भागिदारी केली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजच्या डावात सलामीच्या किंगने 33 चेंडूत 1 षटकार आणि 11 चौकारांसह 63 धावा जमविताना लेव्हीससमवेत 55 चेंडूत 107 धावांची शतकी भागिदारी पहिल्या गड्यासाठी केली. लेव्हीसने 28 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारांसह 50, चेसने 16 चेंडूत 1 चौकारासह 19, कर्णधार पॉवेलने 18 चेंडूत 1 चौकारांसह 13 तर रुदरफोर्डने 12 चेंडूत 1 चौकारांसह नाबाद 14 धावा केल्या. लंकेतर्फे पथिरनाने 27 धावांत 2 तर तिक्ष्णा, हसरंगा आणि कमिंदु मेंडीस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. विंडीजच्या डावात 5 षटकार आणि 20 चौकार नोंदविले गेले. विंडीजने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 74 धावा झोडपल्या.
संक्षिप्त धावफलक: लंका 20 षटकात 7 बाद 179 (कमिंदु मेंडीस 51, असालेंका 59, कुशल मेंडीस 19, राजपक्षे 17, निशांका 11, शेफर्ड 2-39, ए. जोसेफ, एस. जोसेफ, मोती, स्प्रिंगेर प्रत्येकी 1 बळी), विंडीज 19.1 षटकात 5 बाद 180 (किंग 63, लेव्हीस 50, चेस 19, पॉवेल 13, रुदरफोर्ड नाबाद 14, पथिरना 2-27, तिक्ष्णा, हसरंगा, कमिंदु मेंडीस प्रत्येकी 1 बळी)