Sangli Politics : महायुतीला बहुमताने विजयी करा ; ना. उदय सामंत यांचे आवाहन
ईश्वरपूर महायुतीची तयारी जोरात
ईश्वरपूर : उरुण ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीने व्रजमुठ केली असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह महायुतीच्या सर्वच उमेदवारांना बहुमताने विजयी करावे, असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे केले.
येथील विजया सांस्कृतिक भवनमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या बैठकीत नामदार सामंत बोलत होते. दरम्यान महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वनाथ रामचंद्र डांगे व सर्व प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ रविवारपासून कोपरा सभांचे आयोजन केले आहे.
महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी निवडणुकीतून माघार घ्यावी लागलेल्या अमित ओसवाल, चेतन शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची भेट घेवून नाराज न होता, या निवडणुकीत जोमाने काम करा, असे आवाहनकेले. खा. धैर्यशील माने यांनी कार्यकर्ते, मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या.
यावेळी माजी मंत्री, आ.सदाभाऊ खोत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) सांगली जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक, भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख आनंदराव पवार, माजी नगराध्यक्ष अॅड. राजेंद्र उर्फ चिमण डांगे, विक्रम पाटील, माजी उपनगराध्यक्ष संजय कोरे, जयवंत पाटील, रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर खोत, शिवसेना तालुकाप्रमुख सागर मलगुंडे, आमित ओसवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष केदार पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते.