For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धा सोमवारपासून

06:28 AM Jun 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
विम्बल्डन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धा सोमवारपासून
Advertisement

अल्कारेझ, सिनेर, स्वायटेक, गॉफ प्रमुख आकर्षण

Advertisement

वृत्तसंस्था/ विंब्लडन

2024 च्या विंब्लडन ग्रॅन्डस्लॅम ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेला येथे सोमवारपासून प्रारंभ होत आहे. चालु वर्षीच्या टेनिस हंगामातील ही तिसरी ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा आहे. यावेळी विम्बल्डन स्पर्धेत युवा टेनिसपटूंच्या कामगिरीवर अधिक भर दिला जात आहे.

Advertisement

पुरूष विभागात स्पेनचा कार्लोस अल्कारेझ, इटलीचा यानिक सिनेर तर महिलांच्या विभागात पोलंडची टॉप सिडेड इगा स्वायटेक तसेच अमेरिकेची कोको गॉफ हे या स्पर्धेतील प्रमुख आकर्षण राहतील. विम्बल्डन स्पर्धेत स्पेनचा अल्कारेझ हा पुरूष विभागातील विद्यमान चॅम्पियन आहे. तर त्याने आपल्या वयाच्या 21 व्या वर्षी तीन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. मे महिन्यात फ्रेंच ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धा त्याने जिंकली होती. इटलीचा 22 वर्षीय जेनिक सिनेर याला यावेळी विंब्लडन स्पर्धेतील पुरूष एकेरीच्या मानांकनात पहिले स्थान देण्यात आले आहे. गेल्या जानेवारीमध्ये त्याने ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकली होती.

पोलंडची टॉप सिडेड 23 वर्षीय इगा स्वायटेकला महिलांच्या एकेरीत मानांकनांत अग्रस्थान देण्यात आले आहे. तिने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत चारवेळा फ्रेंच ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकली असून तिने एकूण आतापर्यंत पाच ग्रॅन्डस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. यावेळी स्वायटेकला अमेरिकेच्या 20 वर्षीय गॉफकडून कडवा प्रतिकार अपेक्षित आहे. चालु वर्षाच्या टेनिस हंगामात झालेल्या गेल्या तीन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धांमध्ये गॉफने उपांत्यफेरीपर्यंत मजल मारली आहे. सध्या ती या स्पर्धेत महिला एकेरीच्या मानांकनांत दुसऱ्या स्थानावर आहे. स्वायटेक आणि गॉफ यांच्यात आतापर्यंत 12 सामने झाले असून त्यापैकी 11 सामने स्वायटेकने तर एक सामना गॉफने जिंकला आहे. विंब्लडन स्पर्धेत गॉफला आतापर्यंत उपांत्यपूर्व फेरी पार करता आलेली नाही. विंब्लडन स्पर्धेमध्ये यापूर्वी पुरूष विभागात रॉजर फेडरर, स्पेनचा राफेल नदाल आणि सर्बियाचा जोकोविच या अव्वाल टेनिसपटुंनी आपले मक्तेदारी राखली होती. पण आता टेनिस क्षेत्रातील नवी युवा पिढी आकर्षण ठरत आहे. या स्पर्धेत गेल्या दोन वर्षांमध्ये जोकोविचने दोनवेळा सिनेरचा पराभव केला होता. पण अलिकडे सिनेरने डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या अंतिम लढतीत जोकोविचचा पराभव केला होता. तसेच त्याने गेल्या जानेवारीत झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जोकोविचला पराभूत केले होते.

Advertisement
Tags :

.