विरुष्का फॅमिलीसोबत लंडनला शिफ्ट होणार ?
विरुष्का म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दोघेही आपल्या मुलांसोबत लंडनला शिफ्ट होणार असल्याची चर्चा जोरदार सुरु आहे. याआधीही यावर चर्चा झाली होती, पण सत्यता पुढे आली नव्हती.
सध्या टिम इंडियाचा खेळाडू विराट कोहली हा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रोलियाविरुद्या चा तिसरा कसोटी सामना काल झाला. या सामन्यात विराट कोहली हा फारशी चांगली कामगिरी दाखवू शकला नाही.
दरम्यान विराट कोहली त्याच्या कुंटुबासोबत लवकरच लंडनला शिफ्ट होणार असल्याचे समजले. या चर्चेला त्याचे बालपणीचे कोच राजकुमार शर्मा यांनीही दुजोरा दिला आहे. यावेळई प्रशिक्षक शर्मा यांनी कोहलीच्या तंदुरुस्त आरोग्यचे आणि नैतिकतेचं कौतुक केल. त्याच्यावर विश्वास व्यक्त केला. क्रिकेटपटूकडे आगामी काही वर्षांत खेळण्यासाठी बरंच काही आहे. कोहली याचे क्रिकेटमधील भविष्य सुरक्षित असल्याचेही दिसून आले. दरम्यान त्यांच्या लंडनाला शिफ्ट होण्याच्या निर्णयाने चाहत्यांमध्ये एकच चर्चा रंगली आहे. क्रिकेट जगतात उत्सुकता निर्माण झाली आहे. पण याबाबत विराट कोहलीने अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.