कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

समुद्राचा रंग लाल होणार का?

06:13 AM Apr 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कधी दिसत होता हिरव्या रंगाचा

Advertisement

पृथ्वीवर जीवन आमच्या ग्रहाच्या महासागरांच्या रंगाच्या अभिन्न रुपाशी जोडलेले आहे. जल रसायन आणि जीवनाचा प्रभाव पाण्याच्या रंगाला निर्धारित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. भविष्यात पृथ्वीचे महासागर जांभळ्या किंवा लाल रंगाचे होऊ शकतात असा दावा आता वैज्ञानिकांनी केला आहे.

Advertisement

आमच्या ग्रहावर पाणी सध्या निळ्या रंगाचे दिसते, परंतु कधीकाळी हे हिरव्या रंगाचे होते आणि संभाव्य स्वरुपात याचा रंग पुन्हा बदलू शकतो. पृथ्वीच्या बहुतांश हिस्स्यात महासागर आहे. याचमुळे अंतराळातून पाहिल्यास पृथ्वी फिकट निळ्या रंगाची दिसून येते, जपानी संशोधकांनी हे विशाल जलसाठे कधीकाळी हिरव्या रंगाचे होते अशी थेअरी मांडली आहे.

नेचरमध्ये प्रकाशित अध्ययनात जपानच्या ज्वालामुखीय बेट इवो जीमाच्या आसपासच्या पाण्याचे अवलोकन करण्यात आले. जे एकप्रकारच्या ऑक्सीकृत लोहामुळे हिरव्या रंगाचे दिसून येते. हे शेवाळ अनोखे आहे, कारण यात केवळ विशिष्ट क्लोरोफिल वर्णक असण्यासह फाइकोएरिथ्रोबिलिन (पीईबी) नावाचा दुसरा वर्णक देखली असतो. वैज्ञानिकांना स्वत:च्या संशोधनात पीईबी युक्त आनुवांशिक स्वरुपात संशोधित आधुनिक निळे-हिरवे शेवाळ हिरव्या पाण्यात उत्तमप्रकारे वाढत असल्याचे आढळून आले. प्रकाश संश्लेषण आणि ऑक्सिजनच्या उत्पत्तिपूर्वी पृथ्वीच्या महासागरांमध्ये विरघळलेले लोह होते. आर्कियन ईऑन (4 ते 2.5 अब्ज वर्षांपूर्वी)मध्ये प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया सुरू झाल्याने ऑक्सिजन निर्माण होऊ लागले आणि याच्या परिणामादाखल सागरी जलात लोह ऑक्सिकृत होऊन मिसळले गेले.

हिरवा होता समुद्राचा रंग

अध्ययनाच्या कॉम्प्युटर सिम्युलेशनद्वारे प्रारंभिक प्रकाश संश्लेषणातून उत्सर्जित ऑक्सिजनने ऑक्सीकृत लोह कणांची इतके उच्च प्रमाण निर्माण केले पृष्ठभागीय जलाचा रंग हिरवा झाला. एकदा महासागाराचे लोह भांडार पूर्णपणे ऑक्सिकृत झाल्यावर पृथ्वीच्या महासागर आणि वायुमंडळात अनबाउंड ऑक्सिजन भरू लागला.

जीवनाच्या उत्पत्तिच्या प्रारंभाचा संकेत

दूरवून दिसणाऱ्या फिकट हिरव्या रंगाच्या ग्रह प्रकाश संश्लेषक जीवनाच्या उत्पत्तिच्या प्रारंभिक रुपांचा संकेत आहे. अलिकडेच प्रकाशित जपानी संशोधनपत्रात महासागरांचा रंग जल रसायन शास्त्र आणि जीवनाच्या प्रभावाशी निगडित असल्याचे म्हटले गेले आहे.

लाल किंवा जांभळा रंग का होणार?

पृथ्वीवर जांभळ्या रंगाच्या महासागरांचे अस्तित्व शक्य आहे. सल्फरचा पातळी अत्याधिक वाढली, जे संभाव्यपणे ज्वालामुखीय हालचालींमध्ये वृद्धी तसेच वायुमंडळातील ऑक्सिजनमध्sय कमतरतेमुळे हे घडू शकते, तर जांभळया सल्फर बॅक्टेरियाच्या विकासाला प्रोत्साहन देणारे वातावरण निर्माण होऊ शकते. याचबरोबर महासागरांनी लाल रंग धारण करणेही अशक्य नाही. तीव्र उष्णकटिबंधीय हवामानात स्थलीय खडक तुटल्याने लाल-ऑक्सिकृत लोह कणांचे मोठे प्रमाण निघू शकते, जे नद्या किंवा हवेसोबत समुद्रात पोहोचू शकतात. हा लाल ज्वार उत्पन्न करण्यासाठी एका विशेष प्रकारच्या शेवाळाच्या व्यापक प्रभुत्वानेही निर्माण होऊ शकतो. हा लाल शेवाळ सर्वसाधारणपणे नायट्रोजन सारख्या खतांच्या उच्चप्रमाण असलेल्या क्षेत्रांमध्ये आढळून येतो, तसेच अनेकदा सीवर प्रणालींनजीक समुद्र किनाऱ्यांनजीक दिसून येतो.

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article