कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कुंडमळा दुर्घटनेतून सातारा जिल्हा प्रशासन बोध घेणार का?

05:30 PM Jun 16, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

सातारा :

Advertisement

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे समाधीस्थळ असलेल्या देहूपासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर असलेल्या कुंडमळा या ठिकाणी जून लोखंडी पूल कोसळल्याने जवळपास २५ पर्यटक वाहून गेले असल्याची बातमी आहे तर सहा पर्यटकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

Advertisement

इंद्रायणी नदीवरील या जुन्या अश्या पुला बाबत मागील वर्षीअनेकदा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या की सदर पूल हा लोखंडी पूल जुना झाला असून त्या अनुषंगाने प्रशासनाने या लोखंडी पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षित पणामुळे आणि स्थानिक राजकारण्यांच्या नाकर्तेपणा मुळे हि दुर्देवी घटना घडली आहे, या घटनेत रविवारी पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांचा नाहक बळी गेला.

याच अनुषंगाने सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी ही पावसाळी पर्यटनस्थळे म्हणून प्रसिद्ध आहेत यात कास. बामणोली आणि ठोसेघर धबधबा याचा समावेश असतो पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची प्रचंड गर्दी असते.

ठोसेघर धबधबा या ठिकामी उंचावरून पडणारा मोठा धबधबा पहाण्यासाठी अगदी दरीत प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे. अगदी कड्यावर बांधलेल्या या प्रेक्षक गॅलरीवर धबधबा पाहण्यासाठी प्रमाणापेक्षा जास्त गर्दी होते. कुंडमळा या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेतून बोध घेऊन ठोसेघर येथील प्रेक्षक गॅलरीचे स्ट्रक्चरल ऑडिट त्याची मजबुती किती या बाबत गर्दी असते. जिल्हा प्रशासनाने पाऊले उचलावीत. या प्रेक्षक गॅलरीच्या क्षमता किती आहे त्या ठिकाणी असलेले पिलर हे मजबूत आहेत का, प्रचंड पडणाऱ्या पावसाचा या गॅलरीच्या खालील पिलरवर काय आणि किती परिणाम झाला आहे, तो मजबूत आहे का याबाबत तातडीने इंजिनीअरच्या मदतीने ऑडिट करून हे ठिकाण पर्यटकांसाठी सुरक्षित आहेत का याची खात्री करण्यात यावी. ठोसेघर धबधब्यात या आधी अशा दुर्घटना घडलेल्या असून वाहत्या पाण्यात उतरल्याने जवळपास नऊ पर्यटकांचा मृत्यूही झाला आहे.

ठोसेघर याठिकाणी असलेली प्रेक्षक गॅलरी ही अगदी दरीत कक्ष्यावर बांधली आहे. या ठिकाणी जर अशी दुर्घटना घडल्यास मोठी दुर्घटना होऊन शेकडो पर्यटकांच्या मृत्यू होण्याची दाट शक्यता आणि भीती आहे. त्यामुळे हि प्रेक्षक गॅलरी सुरक्षित आहे याची खातरजमा स्थानिक प्रशासनाने तातडीने करावी, आणि गॅलरीच्या मयदिनुसारच त्या ठिकाणी पर्यटकांना सोडण्यात यावे.

सातारा जिल्ह्यात अशी दुर्दवी घटना घडू नये यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पाऊले उचलणे आवशक आहेत. त्याचप्रमाणे याठिकाणी जाळी आणि बेरिकेटिंग करुन योग्य त्या उपाययोजना कराव्यात हीच अपेक्षा.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article