Solapur Crime : सोलापुरात लहान मुलांच्या वादातून चौघांनी केली मारहाण
किरकोळ वादातून पती-पत्नी व मुलीला मारहाण;
सोलापूर : शहरातील न्यू बुधवार पेठ परिसरातील सम्राट चौक येथे लहान मुलांच्या किरकोळ वादातून चौघांनी पती-पत्नीसह त्यांच्या मुलीला मारहाण केल्याची घटना आठ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली.
याप्रकरणी आशा अनिल लोंढे (वय ३७, रा. न्यू बुधवार पेठ, सम्राट चौक) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीवरून आकाश प्रल्हाद शिंदे, अश्विन प्रल्हाद शिंदे, प्रकाश प्रल्हाद शिंदे, यशराज नागेश शिंदे (सर्व रा. सम्राट चौक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी आशा लोंढे यांचा लहान मुलगा यश हा दारात खेळत होता. यावेळी संशयित आरोपी आकाश आणि अश्विन शिंदे यांनी येथे खेळायचे नाही असे म्हणून फिर्यादी व फिर्यादीच्या पती यांना विचारण्यासाठी गेले असता संशयित आरोपी आकाश शिंदे आणि अश्विन शिंदे यांनी शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्याने मारहाण केली.
तसेच फिर्यादीचे पती यांना लाकडाने पायावर मारले. फिर्यादी सोडवण्यासाठी गेले असता संशयित आरोपी अश्विन शिंदे यांनी लोखंडी सळईने पाठीत मारहाण केली. त्यानंतर फिर्यादीची मुलगी ही भांडण सोडवण्यासाठी आले असता तिलाही ओढाओढी करून संशयित आरोपी यशराज शिंदे यांनी हिला पण बघतो अशी शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.