महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्मार्ट सिटीची उर्वरित कामे जून अखेर तरी संपणार का?

01:10 PM Jun 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेली कामे पणजी शहरात ठिकठिकाणी अजूनही सुरू असल्याने ती संपणार तरी कधी असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. कारण 31 मेपूर्वी स्मार्ट सिटीची सर्व कामे संपुष्टात येतील, असे सांगण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात अजूनही कामे सुरू असून जून महिन्याचा मध्य उलटला तरी ही कामे सुरूच असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सांतईनेज ते मलनिस्सारण प्रकल्पापर्यंतचे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेले काम केव्हापर्यंत संपेल हे कंत्राटदारालाही निश्चित सांगता येत नसल्याने या कामाला उशीर लागण्याची चिन्हे आहेत. पणजी शहरातील साईबाबा मंदिरासमोरील रस्त्यावरील तसेच गीता बेकरी या परिसरातही कामे अजूनही सुरूच असल्याने या कामाच्या चाललेल्या संथगतीमुळे लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ज्या ठिकाणचे काम पूर्ण झाले आहे, त्या ठिकाणी डांबरीकरण झालेले आहे. परंतु हे डांबरीकरण सध्या पडलेल्या पावसामुळे काही प्रमाणात धुवून गेलेले आहे. त्यामुळे या कामाचा दर्जा यावरही लोकांमधून शंका उपस्थित केली जात आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेली उर्वरित कामे संपुष्टात येतील का असा प्रश्न आता नागरिकांतून विचारला जात आहे. दरम्यान, स्मार्ट सिटीच्या कामाचाच एक भाग म्हणून नव्याने पथदीप बसविण्याचे काम शहरात सुरू झालेले आहे. ईद सुटी असतानाही काम जोरात सुरू होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article