For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वादावर पडदा, दुभंगलेली मने जुळणार काय?

12:05 PM Nov 07, 2024 IST | Radhika Patil
वादावर पडदा  दुभंगलेली मने जुळणार काय
Will the controversy be over, will the divided hearts reconcile?
Advertisement

उमेदवारीला विरोध, टक्केवारीच्या आरोपामुळे माजी नगरसेवक, राजेश लाटकर यांच्यात दुरावा

Advertisement

कोल्हापूर/ विनोद सावंत :

उत्तर विधानसभा निवडणूकीत काँग्रेसमध्ये उमेदवारी दाखल करण्यापासून अर्ज माघारी घेण्यापर्यंत नाट्यामय घडामोडी घडल्या. बंडखोरी केलेले राजेश लाटकर यांनी माघार घेतली नसल्याने काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवत असणाऱ्या मधुरिमाराजे यांनीच खुद्द माघार घेतली. यावेळी जोरदार वादावादी झाली. याचबरोबर उमेदवारीला विरोध केल्यामुळे लाटकर आणि माजी नगरसेवकांमध्ये दुरावा निर्माण झाला. लाटकरांनी काही नगरसेवकांवर टक्केवारीचे आरोप केले. यानंतर काँग्रेसने लाटकरांना पुरस्कृत उमेदवार जाहीर केला असून एकजुटीने त्यांना निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. असे असले तरी लाटकर आणि माजी नगरसेवकांची दुभांगलेली मने जुळणार काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Advertisement

लोकसभेची नुकतीच निवडणूक झाली. या निवडणूकीत महाविकास आघाडी ताकदीने उतरली होती. विशेषत: काँग्रेसमधील नेते एकमेंकातील हेवेदावे बाजूला ठेवून एकजुटीने मैदानात उतरले होते. याचा परिणामी निकालानंतर दिसून आला. राज्यात सर्वाधिक जागा महाविकास आघाडीला मिळाल्या. कोल्हापूर लोकसभाही याला अपवाद नव्हती. शाहू छत्रपती यांना विजयी करण्यासाठी कोल्हापुरातील काँग्रेसमधील माजी नगरसेवकांसह नेते, पदाधिकाऱ्यांनी रात्र दिवस एक केला. यामध्ये त्यांना यशही आले. शाहू छत्रपती विजयी झाले. परंतू विधानसभेच्या निवडणूकीमध्ये काँग्रेसमधील एकजुटीला कोणाची नजर लागली कळाले नाही.

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूकीमध्ये काँग्रेसमध्ये उमेदवारी हा कळीच मुद्दा ठरला. माजी नगरसेवकांच्या विरोधामुळे राजेश लाटकार यांना दिलेली उमेदवारी रद्द केली. लोकसभा निवडणूकीमध्ये एकसंघ असणारे काँग्रेसच्या माजी नगरसेवकांमध्ये फुट पडली. लाटकरांच्या जागी मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली. तर लाटकरांनी अपक्ष अर्ज दाखल केला. त्यांनी काही नगरसेवकांवर टक्केवारीचा आरोप केला.

लाटकर माघार घेणार असाच दावा काँग्रेसचे वरीष्ठ नेते करत होते. परंतू तसे झाले नाही. यामुळेच मधुरिमाराजे छत्रपती यांनीच माघार घेतली. यावरूनही मोठा वाद झाला. एकीकडे पक्षाचा उमेदवारच राहिला नसल्याने काँग्रेसने राजेश लाटकर यांना पुरस्कृत उमेदवार घोषित केले. यावेळी वादावर पडदा पडल्याचे नेत्यांनी जाहीर केले. एकजूटी आणि ताकदीने लाटकरांना निवडून आणण्याचा निर्धारही केला. जरी नेते वादावर पडदा पडल्याचे म्हणत असले तरी लाटकर आणि माजी नगरसेवकांमध्ये पडलेला दुरावा तसेच दुभांगलेली मने पुन्हा जुळणे सहजासहजी शक्य नसल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. काँग्रेस कमिटीत नुकत्याच झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत लाटकर, माजी नगरसेवक उपस्थित होते. परंतू त्यांच्यामध्ये कोणताही संवाद झाला नसल्याने दुरावा कायम असल्याचे दिसून आले. ही दुंभगलेली मने मतदानापूर्वी जुळण्यासाठी आता नेत्यांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.

महायुती एकसंघ, काँग्रेसमध्ये असंतोष
महायुतीमध्येही प्रारंभी उमेदवारीवरून रस्सीखेच होती. परंतू एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आघाडीतील सर्व एकसंघ होऊन प्रचारासाठी उतरले आहेत. प्रचाराचा नारळही त्यांनी कोल्हापुरातच फोडला. पेठापेठांमध्ये त्यांच्याकडून प्रचारही सुरू झाला आहे. दुसरीकडे काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून असंतोष निर्माण झाला असुन उमेदवार देण्यामध्येच आठ दिवस गेले.

काँग्रेसमधील वाद, महायुतीच्या पथ्यावर
विधानसभेच्या निवडणूकीत नगरसेवकांना महत्व असते. त्यांचा प्रभागात मतदारांशी थेट संपर्क असतो. असे असतानाच काँग्रेसच्या माजी नगरसेवकांमध्ये मात्र, उमेदवारीवरून वाद झाले. यामुळे विरोधात गेलेले माजी नगरसेवक लाटकरांसाठी प्रचारात ताकदीने उतरणार काय हे पाहणे औत्सुक्याचे आहे. या उलट काँग्रेसमधील वाद महायुतीच्या पथ्dयावर पडत आहे. लाटकरांच्या विरोधात असणारे नगरसेवक गळाला कसे लागतील यासाठी रणनिती आखली जात आहे.

रणनितीकारच आरोपीच्या पिंजऱ्यात
लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीतील ज्या रणनितीकार, पडद्यामागील सुत्रधारांनी भूमिका निर्णयक ठरली. तेच विधानसभेच्या निवडणूकीत आरोपीच्या पिंजऱ्यात सापडल्याचे दिसून आले. अतिअत्मविश्वास त्यांना नडल्याचेही समोर आले.

Advertisement
Tags :

.