कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कॅस्पियन समुद्र गायब होणार का?

06:49 AM Aug 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

5 वर्षांत 3 फुटांनी खालावली पाणीपातळी : 5 देशांसाठी धोका

Advertisement

कॅस्पियन समुद्राला जगातील सर्वात मोठे खारे सरोवर म्हटले जाते. हा समुद्र आता वेगाने आपुंचित पावत आहे. अझरबैजानच्या अधिकाऱ्यांनी याविषयी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. मागील 5 वर्षांमध्ये याची पातळी 0.93 मीटरने (3 फूट) कमी झाली आहे. ही घसरण दरवर्षी 20-30 सेंटीमीटरच्या वेगाने होत आहे. या आकुंचित पावणाऱ्या सागराचा प्रभाव केवळ तेलवाहतूक आणि बंदरांवर पडत नसून स्टर्जन मासे आणि पॅस्पियन सील यासारख्या प्रजातीही धोक्यात आहेत. अझरबैजानचे उपपर्यावरणमंत्री रउफ हाजीयेव यांनी या संकटाला आर्थिक आणि पर्यावरणीय आपत्ती ठरविले आहे.

Advertisement

जगाचा अनमोल खजिना

कॅस्पियन समुद्र अझरबैजान, इराण, कजाकिस्तान, रशिया आणि तुर्कमेनिस्तान या 5 देशांनी वेढलेला आहे. हा जगातील सर्वात मोठा कैद जलाशय आहे, याची खोली आणि विशाल आकार याला कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचे केंद्र म्हणून ओळख प्रदान करतो. याचबरोबर हे स्टर्जन माशांचे मुख्य ठिकाण असून ज्याच्या कॅवियारची (अंडी) जगभरात मोठी मागणी आहे. तसेच कॅस्पियन सील यासारख्या अनोख्या प्रजातीही येथेच आढळून येतात. परंतु आता हा सागर वेगाने आपुंचित होत असल्याने या देशांची अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि स्थानिक लोकांच्या जीवनावर खोलवर प्रभाव पडत आहे.

जलस्तरात घट : किती आणि का?

कॅस्पियन समुद्राचा जलस्तर दशकांपासून कमी होत आहे, परंतु अलिकडच्या वर्षांमध्ये हा वेग वाढला आहे. आकडेवारीनुसार...

1: मागील 5 वर्षांमध्ये जलस्तर 0.93 मीटरने खालावला

2: मागील 10 वर्षांमध्ये 1.5 मीटरने जलस्तर कमी झाला

3: मागील 30 वर्षांमध्ये 2.5 मीटरची घसरण नोंद झाली

4: समुद्राचा जलस्तर दरवर्षी 20-30 सेंटीमीटरने कमी होतोय

यामागील दोन मुख्य कारणे..

हवामान बदल : वाढते तापमान आणि कमी पावसामुळे सागरात पाण्याचा प्रवाह कमी होत आहे. वोल्गा नदी सागरात 80 टक्के पाण्याचा पुरवठा करते, नदीतील पाण्याचे प्रमाण घटले आहे.

वोल्गा नदीवरील धरण : रशियाने वोल्गा नदीवर 40 धरणे बांधली असून आणखी 18 धरणांची निर्मिती केली जात आहे. ही धरणे वीज आणि सिंचनासाठी पाणी रोखत आहेत, यामुळे सागरापर्यंत पाणी पोहोचत नसल्याचे अझरबैजानचे सांगणे आहे.परंतु रशिया या समस्येचे मुख्य कारण हवामान बदलाला मानतो. काही वैज्ञानिक म्हणजेच तेलमन जैनालोव आणि प्योत्र बुखारित्सिन यांचे सागराच्या जलस्तरातील उतारचढाव नैसर्गिक आणि सक्रीय असल्याचे सांगणे आहे. परंतु कझाकिस्तानचे पर्यावरणतज्ञ किरिल ओसिन यांच्यानुसार हवामान बदल आणि नद्यांचा अत्याधिक वापर या संकटाला वाढवतेय.

आर्थिक प्रभाव : कच्चे तेल आणि बंदर

कॅस्पियन समुद्र आपुंचित पावत असल्याचा सर्वात मोठा प्रभाव अझरबैजानच्या अर्थव्यवस्थेवर पडत आहे. हा देश कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूसाठ्यावर निर्भर आहे. बाकू इंटरनॅशनल सी पोर्टचे संचालक  सलाखोव यांनी कमी होणाऱ्या जलस्तरामुळे जहाजांना समस्या निर्माण होत असल्याचे सांगितले.

? तेल शिपमेंटमध्ये घट झाली आहे. दुबेंदी ऑइल टर्मिनलमधुन चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत 8.1 लाख टन तेल आणि तेल उत्पादने पाठविण्यात आली. हे प्रमाण मागील वर्षाच्या 8.8 लाख टनापेक्षा कमी आहे.

? लॉजिस्टिक खर्च वाढला आहे, कारण जहाजांची माल वाहून नेण्याची क्षमता घटली आहे.

? बंदरांची खोली वाढविण्यासाठी डेजिंगचे काम करावे लागत आहे. 2024 मध्ये दुबेंदी टर्मिनलवर 2.5 लाख घनमीटर ड्रेजिंग करण्यात आले.

? बाकू शिपयार्डने एप्रिलमध्ये एक नवे ड्रेजिंग जहाज इंजिनियर सोल्तान काजिमोव निर्माण केले जे समुद्रतळाला 18 मीटरपर्यंत खोल करू शकते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article