मिरकरवाडा विकासासाठी भरीव निधी देणार
महायुतीचे उमेदवार तथा मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन; मच्छीमारांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न
रत्नागिरी :
शहरातील मिरकरवाड्यात आतापर्यंत अनेक मोठी विकासकामे करण्यात आली आहेत. मच्छीमार, व्यावसायिक यांच्या समस्या सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. यापुढेही मिरकरवाड्याच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले.
शहरातील मिरकरवाडा येथील महायुतीचा मेळावा रविवारी सायंकाळी उशीरा पार पडला. मेळाव्याला राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री सामंत यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी सामंत यांनी रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हासमोरील बटण दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन मिकरवाडावासियांना उपस्थित केले. मिरकरवाड्यात आतापर्यंत मोठी विकासकामे करण्यात आली आहेत. मच्छीमार, व्यावसायिकांच्या
समस्या सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. यापुढे ही मिरकरवाड्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन सामंत यांनी दिले.