महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी स्मार्ट वॉच, हेल्मेट्स पुरवणार

01:01 PM Aug 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची घोषणा : वीज कामगार संघटनेचा सुवर्णमहोत्सव उत्साहात

Advertisement

फोंडा : राज्यातील प्रत्येक ग्राहकापर्यंत सुरळीत व सुरक्षित वीज पोचविण्याचा वीजखात्याचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यासाठी वीज कर्मचाऱ्यांपासून अभियंत्यांपर्यंत सर्वजण अहोरात्र कार्यरत असतात. ही सेवा देताना बऱ्याचवेळा जोखीम पत्करावी लागते. वीज उपकरणे हाताळताना संभाव्य धोक्यांपासून तात्काळ सतर्क करणारी ‘स्मार्ट वॉच व स्मार्ट हेल्मेट’ हा प्रयोग लवकरच वीज खात्यातर्फे प्रत्यक्षात आणला जाणार आहे, अशी घोषणा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली. वीज खाते कामगार संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात मंत्री ढवळीकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. आयटकशी संलग्न असलेल्या या संघटनेचा हा कार्यक्रम काल रविवारी बेतोडा रोड, फोंडा येथील भोलानाथ सभागृहात साजरा करण्यात आला. व्यासपीठावर आयटकचे राष्ट्रीय सरचिटणीस ख्रिस्तोफर फोन्सेका, गोवा राज्य अध्यक्ष प्रसन्ना उट्टगी, वीज खाते कामगार संघटनेचे अध्यक्ष कार्लोस फालेरो व सरचिटणीस राजू मंगेशकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

Advertisement

सध्या 35 हजार कोटींची कामे सुरू

वीजखात्यातर्फे राज्यात भूमिगत वीजवाहिन्या योजनेसह सर्व यंत्रणांमध्ये आमूलाग्र सुधारणा घडविण्यासाठी तब्बल 35 हजार कोटींची विकासकामे हाती घेण्यात आल्याची माहिती मंत्री सुदिन ढवळीकर यांनी पुढे बोलताना दिली.

कर्मचारी सुरक्षेबाबत तडजोड नाही 

प्रत्यक्ष फिल्डवर वीजवाहिन्या व अन्य उपकरणांचे दुऊस्तीकाम पाहणारे लाईनमन, साहाय्यक व अन्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत कुठलीच तडजोड केली जाणार नाही. गोवा अभियांत्रिकीच्या माध्यमातून वीज कर्मचाऱ्यांसाठी धोक्याच्या सूचना देऊन सतर्क करणारी ‘स्मार्ट वॉच व हेल्मेट’वर सध्या काम सुऊ आहे. हा प्रयोग लवकरच प्रत्यक्षात आणला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा विचार 

गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या खात्याच्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा सरकारचा विचार असल्याचेही ढवळीकर यांनी यावेळी जाहीर केले. वीज खात्याच्या चांगल्या कामाची दखल विधानसभा अधिवेशनात काही आमदारांनी घेतल्याचा उल्लेख कऊन जनतेला चांगली सेवा देण्यासाठी सदैव तत्पर राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 वीज खात्याचे खासगीकरण नको : फोन्सेका 

मंत्री सुदिन ढवळीकर व अन्य मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्ज्वलीत कऊन सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. वीजखाते जनतेला चांगली सेवा देत असून या खात्याचे खासगीकरण कऊ नये, अशी मागणी ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी केली. खासगीकरणामुळे खात्यात एकाधिकारशाही ऊजण्याचा अधिक धोका असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रसन्ना उट्टगी व राजू मंगेशकर यांनीही यावेळी संघटनेच्या कार्याविषयी आपले विचार मांडले. संघटनेशी संबंधीत माजी पदाधिकाऱ्यांचा यावेळी ढवळीकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. प्रवीण पालेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर आबेल डिसिल्वा यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article