महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राज्यातील उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देणार : मुख्यमंत्री

12:29 PM Nov 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

स्वयंपूर्णा ई-बाजार पोर्टल सुरू : गोमंतकीय बांधवांचे योगदान मोठे

Advertisement

पणजी : राज्याचा सर्वांगीण विकास आणि प्रगती यामुळे गोव्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर अग्रक्रमाने घेतले जात आहे. यामध्ये गोमंतकीय बांधवांचे योगदान मोठे आहे. राज्याची संस्कृती आणि परंपरा यांचा देश-विदेशात गौरव केला जातो. राज्यात पारंपरिक उत्पादन घेण्यासाठी स्थानिक लोक मोठे कष्ट घेत आहेत. त्यांच्या उत्पादनांना राष्ट्रीय तसेच जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सरकार आग्रही आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. स्वयंपूर्णा ई-बाजार पोर्टलचे काल (शुक्रवारी) लाँच करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, गोव्यातील 46 हजार बचत गट सदस्य आणि 12 हजार हस्तकला व्यक्तींच्या सेवा आणि उत्पादनांना राष्ट्रीय आणि जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी स्वयंपूर्ण ई-बाजार पोर्टल हा उपक्रम राबविण्यामागील उद्देश आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बचत गटांच्या नोंदणीबाबत माहिती देताना मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, उत्पादने आणि सेवा https://www.swayampurnagoa.com/ या पोर्टलवर ऑनलाइन उपलब्ध आहेत. आजपर्यंत 52 बचत गटांनी या उपक्रमांतर्गत सरकारकडे नोंदणी केली आहे आणि त्यांना उत्पादनांची ऑनलाइन विक्री करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण दिले जात आहे.

Advertisement

‘स्वयंपूर्ण पोर्टल’ उभारी देईल

लाँच करण्यात आलेले स्वयंपूर्णा ई-बाजार पोर्टल हे स्थानिक उत्पादनांना उभारी देईल. या पोर्टलचा जे उत्पादक अधिकाधिक लाभ घेतील, त्यांना राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होण्याचा मार्ग खुला आहे. स्थानिक उत्पादनांना स्वयंपूर्णा ई-बाजार पोर्टल उभारी देईल, असा विश्वास मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article