मेडिकल कॉलेजची जागा हडपू देणार नाही
मिरज :
मिरज मेडिकल कॉलेजच्या जागेवर महाराष्ट्र शासनाचे नांव लागल्याने ‘म्हाडा’ ही जागा घेण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबत पालकमंत्र्यांसह वरिष्ठांशी चर्चा झाली आहे. ही जागा हडपण्याचा म्हाडाचा प्रयत्न हाणून पाडू, असा दावा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.
शासकीय रुग्णालयातील बाळ चोरी प्रकरणी जबाबदार सुरक्षा रक्षकांवर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.
शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ऊग्णालय या संस्थेसाठी शासनाच्या निधीतून विविध विभागात विकसित करण्यात आलेल्या कोट्यावधी रुपयांच्या कामांचा शुभारंभ सोमवारी सायंकाळी मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, मिरज मेडिकल कॉलेजची जागा कोणत्याही अन्य शासकीय विभागांना दिली जावू नये, असे सुचित करण्यात आले आहे. पण ही जागा म्हाडा घेण्याचा प्रयत्न करत आहे. सदर जागेवर महाराष्ट्र शासनाचे नांव लागल्याने त्यांचा हा प्रयत्न सुऊ आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर योग्य ती चर्चा सुऊ आहे. आजच पालकमंत्र्यांशी याबाबत बोललो आहे. वैद्यकीय महाविद्यालयालाच विविध विभाग सुरू करण्यासाठी जागा कमी पडत असल्याने म्हाडाचा जागा हडपण्याचा प्रयत्न निश्चितच हाणून पाडू, असा दावा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.
ऊग्णालयातील बाळ चोरी प्रकरणात निश्चितच काही चुका झाल्या. आरोपी मfिहलेने लगट कऊन उपचाराच्या निमित्ताने बाळाला ऊग्णालयाबाहेर नेले. पण सुरक्षा रक्षकांची तिला अडविण्याची जबाबदारी होती. जबाबदार सुरक्षा रक्षकांवर कारवाईसाठी अधिष्ठांतांना डॉ. प्रकाश गुरव यांना सुचित केले आहे. आठ दिवसात संबंधीतांवर कारवाई केली जाईल, असेही मुश्रीफ म्हणाले.
आगामी दोन वर्षात जिल्हास्तरावरील सर्व शासकीय ऊग्णालये अद्ययावत करणार आहोत. ज्यामुळे ऊग्णांना मुंबई-पुण्याला जावे लागणार नाही. यासाठी राज्यातील 39 शासकीय महाविद्यालयातील ऊग्णालयांना भेटी देण्याच्या सुचना सचिवांना देण्यात आल्या आहेत. जिथे अपुऱ्या सुविधा असतील त्या अल्पावधीत पूर्ण केल्या जातील. सर्व ऊग्णालये सुसज्ज कऊन कोठेही उपचाराची कमतरता भासणार नाही, याची दखल घेतली जाईल, अशी हमीही त्यांनी दिली.
- सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभे करुच
शासकीय ऊग्णालयात सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याच्या वक्तव्याकडे लक्ष वेधले असता, त्यांनी याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची यासाठी भेट घेतली आहे. सध्या आम्ही केंद्राची वाट पहातोय. केंद्राकडून आम्ही सुपरस्पेशालिटीसाठी प्रयत्न करणार नाही, असे कळविण्यात आले तर राज्य शासनाकडून याबाबत ठोस पाऊले उचलली जातील. पण सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल आगामी काळात उभे कऊच, अशी हमीही त्यांनी fिदली. कॅन्सर ऊग्णालयासंदर्भात मंत्रीमंडळाच्या बैठकीत सर्वच शासकीय ऊग्णालयात आम्ही कॅन्सर उपचाराची व्यवस्था करतोय. यामध्ये मोठ्या आजारासाठी टाटामध्ये सोय करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.