महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्वामिनाथन आयोगानुसार एमएसपी लागू करू : राहुल गांधी

06:26 AM Feb 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शेतकरी आंदोलनाला दर्शविला पाठिंबा : सत्तेवर आल्यावर घेऊ निर्णय

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

पंजाब, हरियाणा आणि उत्तरप्रदेशच्या शेतकरी संघटनांनी स्वत:च्या मागण्यांसोबत राष्ट्रव्यापी आंदोलनाची पूर्ण तयारी चालविली आहे. स्वत:च्या मागण्यांकरता दबाव निर्माण करण्यासाठी शेतकरी संघटना रस्त्यांवर उतरल्या आहेत. याचदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या शेतकरी संघटनांचे समर्थन करत काँग्रेस स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार एमएसपी लागू करणार असल्याचे म्हटले आहे. हीच काँग्रेसची शेतकऱ्यांना पहिली गॅरंटी असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

शेतकरी बंधूंसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. काँग्रेसने प्रत्येक शेतकऱ्याच्या पिकाकरता स्वामिनाथन आयोगानुसार एमएसपीची कायदेशीर गॅरंटी देण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाऊल 15 कोटी शेतकरी कुटुंबांची समृद्धी निश्चित करत त्यांचे जीवन बदलणार आहे. न्यायाच्या मार्गावर ही काँग्रेसची पहिली गॅरंटी असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

शेतकरी आज दिल्लीच्या दिशेने कूच करत असताना त्यांना रोखेल जात आहे, त्यांच्यावर अश्रूधूराचा मारा केला जात आहे. हे शेतकरी केवळ स्वत:च्या मेहनतीसाठी योग्य मूल्य मागत आहेत. भाजप सरकारने एम.एस. स्वामिनाथन यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली, परंतु स्वामिनाथन यांच्या शिफारसी लागू करण्यास भाजप तयार नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी छत्तीसगडच्या अंबिकापूर येथे बोलताना केला आहे.

स्वामिनाथन आयोगाने स्वत:च्या अहवालात शेतकऱ्यांना एमएसपीचा कायदेशीर अधिकार मिळायला हवा असे स्पष्टपणे नमूद आहे, परंतु भाजप सरकार याकरता टाळाटाळ करत आहे. इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास आम्ही भारताच्या शेतकऱ्यांना एमएसपीची गॅरंटी देणारा कायदा निर्माण करणार आहोत. स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारसी आम्ही अंमलात आणू असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article